अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
Congress Corporators Shocking Video Viral : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच चंद्रपूरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका टोळीने समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्सला अडवून काँग्रेस नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. तसच या टोळक्याने नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकीही दिली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समृध्दी महामार्गावर नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नगरसेवक पुण्यावरून नागपूरकडे खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत होते. त्यावेळी समृध्दी महामार्गावरील गणेशपूर शिवारात त्यांची बस अडवण्यात आली. तोंडाला रुमाल बांधलेल्या तरुणांची एक टोळी बसमध्ये घुसली आणि त्यांनी नगसेवकांना धमकावलं. आमच्यासोबत चला नाहीतर जीवे मारू असं म्हणत त्यांनी धमक्या दिल्या. नगरसेवक राजेश अडूर यांनी हिंमत दाखवून या गुंडांचा सामना केला. राजेश अडूर त्यांची पत्नी अश्विनी,नगरसेवक मित्र सचिन कत्याल,सोफीया खान,अब्दुल करीम शेख,वसंता देशमुख,करिष्मा जंगम आणि इतर नगरसेवक या बसमध्ये होते.आरोपी चार ते पाच खासगी वाहने घेऊन आले होते. त्यांनी सावंगीजवळील गणेशपूर शिवारात ही बस अडवली.
नक्की वाचा >> Ajit Pawar Death : राज्याचा पुढील अर्थसंकल्प कोण सादर करणार? 'या' 3 नेत्यांची होतेय चर्चा
इथे पाहा समृद्धी महामार्गावरील धक्कादायक व्हिडीओ
त्यानंतर वादविवाद झाला आणि राजेश अडूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर सर्व जण वाहने घेऊन पळून गेले. परंतु, त्यांनी एकाला पकडलं. कॉनेन शमीम सिद्धीकी (२१) असं या आरोपीचं नाव आहे. तो इंदिरानगर,खापरखेडा येथील रहिवासी असल्याचं समजते.मुजम्मौल खान, (मोमीनपुरा,नागपूर), जासीम खान, (मानकापूर), आलोक रोहीदास (अजनी,नागपूर), अदनान शेख, (मानकापूर, नागपूर), सौरभ (मानकापूर) हे सोबत आले होते,असं शमीमने त्यांना सांगितलं.त्यानंतर अडूर यांनी याप्रकरणाची पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी सौरभ ठोंबरे,कॉनेन शमीम सिद्धीकी यांच्यासह इतर १० ते १५ साथीदारांविरुध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी भरतीय न्याय संहिता कलम १२६ (२), १८९ (२), १९०, ३५१ (३), ३५२ नुसार गुन्हा नोंदवला आहे.