
Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात दोन मतप्रवाह आहे. काही जण सत्तेत अजित पवारांसोबत जाण्यास इच्छुक आहेत, असं काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी म्हटलं होतं. तर पत्रकारांसोबत अनौपचारिक बोलताना, उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटू नये, असंही शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार या चर्चांना मागील काही दिवसांपासून उधाण आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आता पु्न्हा एकदा शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदारांना सत्तेत जायचे वेध लागले आहेत. विरोधात बसण्याची आमदारांची तयारी नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत शरद पवारांनी ही खंत बोलून दाखवली. त्यामुळे शरद पवारांचे आमदार सत्तेत जाण्यास आतुर झालेले असताना महाविकास आघाडीचं भवितव्य काय असा प्रश्न आहे, उपस्थित होतो आहे.
(नक्की वाचा- Donald Trump U Turn ट्रम्प पलटले,आता म्हणतात मी शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली नाही)
अजित पवारांना काय म्हटलं होतं?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिकरणाची सध्या तरी चर्चा नाहीत. विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे हा चर्चेचा विषय नाही, असं अजित पवारांनी 'NDTV मराठी' शी बोलताना स्पष्ट केलं होतं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागण्याची शक्यता असल्यानं या चर्चा होत आहेत. आगामी काळातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने ते (शरद पवार) या प्रकारचं वक्तव्य करत असतील, असंही अजित पवारांनी म्हटलं होतं.
(नक्की वाचा- युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना खंडणीसह जीवे मारण्याची धमकी; काँग्रेस कार्यकर्त्याविरोधात गुन्हा)
मविआ वाचवण्यासाठी प्रयत्न
महाविकास आघाडी वाचवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरु केले आहेत. शरद पवारांच्या भेटीनंतर नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच हर्षवर्धन सपकाळ आणि उद्धव ठाकरेंची भेट होणार आहे. महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही नेत्यांची भेट ठरवली. मात्र आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची पकड सैल होताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीत तिनही पक्ष काय करणार याकरिता मविआ नेत्यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world