जाहिरात

हार्बर लोकल सेवेचा प्रवास सँडहर्स्ट रोड स्थानकापर्यंत; लोकल ट्रेनच्या वाहतुकीत का होणार बदल?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी चाचपणी सुरु आहे. 

हार्बर लोकल सेवेचा प्रवास सँडहर्स्ट रोड स्थानकापर्यंत; लोकल ट्रेनच्या वाहतुकीत का होणार बदल?
मुंबई:

सीएसएमटी परळ (CSMT-Paral) सहाव्या मार्गिकेसाठी चाचपणी सुरू झाली असून हार्बरमार्गावरील ट्रेन सँडहर्स्ट रोड स्थानकापर्यंत तर भायखळ्याचा फास्ट थांबा रद्द होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी चाचपणी सुरु आहे. 

एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग सन 2008 मध्ये मंजूर करण्यात आला होता. रुळांलगत असलेल्या जागेच्या अनुपलब्धतेमुळे सीएसएमटी ते परळ आणि कुर्ला ते परळ अशा दोन टप्प्यांत प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सीएसएमटी ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गांसाठी आता तयारी सुरू झाली आहे. 

नक्की वाचा - जणू पांडुरंगानेच दाखवला मार्ग! वारीत हरवला, 250 किमी पार करीत 'महाराज' सुखरुप घरी

सीएसएमटी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन हार्बर लोकल सँडहर्स्ट रोड स्थानकातच थांबवण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला आहे. यामुळे सीएसएमटीतील हार्बरसाठीचा फलाट अतिरिक्त फलाट म्हणून उपलब्ध होईल. यासोबतच भायखळ्यातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन जलद लोकलसाठीचा फलाट तोडून त्या ठिकाणी अतिरिक्त मार्ग उभारण्यात येईल. भायखळा स्थानकातून जलद लोकलवरील प्रवाशांची संख्या कमी आहे. त्यामुळे याचा वापर नव्या मार्गिकांकरिता करण्यासाठी जलद मार्गावरील फलाट तोडून त्या ठिकाणी नवी मार्गिका उभारणे शक्य आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हार्बर लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंत चालवणे आणि जलद लोकलचा भायखळा थांबा हटवणे हा एकमेव पर्याय सीएसएमटी ते परळदरम्यान अतिरिक्त मार्गिकांसाठी कमी खर्चात आणि निश्चित कालावधीत करणे शक्य आहे. सँडहर्स्ट रोड स्थानकात हार्बर मार्ग उन्नत आणि मुख्य मार्ग जमिनीवर आहे. यामुळे हार्बरने सीएसएमटीपर्यंत प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना मुख्य मार्गावरील लोकल पकडून सीएसएमटी गाठणे शक्य आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com