
How to lose weight naturally: सकाळचा नाश्ता दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा आहार असतो. योग्य पद्धतीने नाश्ता करणं हा चांगल्या जीवनशैलीचा भाग आहे. अधिकतर लोक आपलं वजन कमी करण्यासाठी नाश्ता करणं टाळतात. मात्र हे योग्य आहे का? नाश्ता तुमच्या मेटाबॉलिज्म अॅक्टिव्ह करतो. शरीराला ऊर्जा देतो आणि दिवसभर खाण्याची इच्छा नियंत्रणात ठेवतो. यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वजन कमी (lose weight) करू इच्छित असाल तर नाश्ता आवश्यक आहे.
मात्र ब्रेकफास्टमध्ये योग्य खाद्यपदार्थांचा समावेश आवश्यक आहे. ब्रेकफास्टमध्येच अशा पदार्थांचा समावेश करावा, ज्यामुळे बऱ्याच काळासाठी तुम्हाला भूक लागणार नाही. त्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. यामध्ये अधिक फायबर, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स आवश्यक आहे. अशा पाच नाश्त्याच्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल...
वजन कमी करण्यासाठी काही खाद्यपदार्थ....
बेसन आणि मुगाच्या डाळीचा पोळा...
वजन कमी (lose weight) करण्यासाठी तुम्ही नाश्त्यात बेसन किंवा मूग डाळीचा पोळा किंवा चिला खाऊ शकता. हे खाण्यास चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. या पोळ्यामुळे पोट बऱ्याच काळासाठी पोट भरलेलं राहतं. ज्यामुळे अतिरिक्त खाणं होत नाही.

Add image caption here
अंड...
वजन कमी करणाऱ्यांसाठी अंड हा एक चांगला पर्याय आहे. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतं. त्यामुळे पोट बराच काळासाठी भरलेलं राहतं. आणि वजन कमी करण्यास मदत होते. दररोज नाश्यात तुम्ही उकडलेलं अंड खाऊ शकता. किंवा अंड्याचं ऑमलेट किंवा भुर्जी बनवून खाऊ शकता. यादरम्यान तेलाचा फार वापर करू नये.
पनीर...
वजन कमी करण्यासाठी पनीर अत्यंत फायदेशीर आहे. पनीरमधील प्रथिनं, कॅल्शियम आणि हेल्दी फॅट तुमचं वजन कमी करण्यास मदत करतात. तुम्ही पनीर भुर्जी आणि सँडविचच्या स्वरूपात देखील खाऊ शकता. यासोबतच, सकाळी नाश्त्यात मीठ आणि काळी मिरी घालून तुम्ही कच्चे पनीर देखील खाऊ शकता.
लाप्सी...
वजन कमी करण्यासाठी लाप्सी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात प्रथिनं, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि फोलेट सारखे पोषक घटक जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे ते पोट बराच काळ भरलेले ठेवते आणि पचन शक्ती चांगली राहते. तिखटातील लाप्सी करावी आणि यात विविध भाज्या घालाव्यात. त्यामुळे हा खाद्यपदार्थ अधिक पौष्टिक होतो.
इडली सांबार...
इडली-सांभार केवळ चविष्टच नाही तर खूप आरोग्यदायी देखील आहे. त्यात प्रथिनं, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि खनिजं जास्त प्रमाणात असतात. इडली सांबर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. इडली पचायलाही सोपी असते आणि ती खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world