जाहिरात

हृदयविकार! लक्षणे, निदान व उपचार पध्दती

बदलत्या जीवनशैलीनुसार वाढता ताण-तणाव, नैराश्य, व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप या साऱ्याच गोष्टींचा थेट परिणाम हृदयावर होत असतो.

हृदयविकार! लक्षणे, निदान व उपचार पध्दती
मुंबई:

हृदयविकार हा सर्वात धोकादायक आणि प्राणघातक आजार आहे. धूम्रपान, बैठे काम, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉलची पातळी, मधुमेह, स्थूलता, तणाव आणि वाढते वय यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. बदलत्या जीवनशैलीनुसार वाढता ताण-तणाव, नैराश्य, व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप या साऱ्याच गोष्टींचा थेट परिणाम हृदयावर होत असतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला हृदयाशी संबंधित अशी काही लक्षणे आपल्याला जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हृदय पूर्णपणे काम करणं बंद करतं, तेव्हा त्याला कार्डिअॅक अरेस्ट असं म्हटलं जातं. कार्डिअॅक अरेस्टचा अर्थ हृदयाची क्रिया अचानक बंद पडणं. हा दीर्घ आजाराचा भाग नाही, त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांमध्ये सर्वात धोकादायक मानला जातो. कार्डिअॅक अरेस्टमध्ये रक्ताभिसरण आणि हृदय धडधडण्याची प्रक्रिया बंद होते. हृदयामध्ये सोडियम, कॅल्शियम, आणि पोटॅशियमचे चॅनेल्स असतात. या चॅनेल्समध्ये असंतुलन निर्माण झालं, तर हृदयाची धडधड अनियमित होते. त्याला वैद्यकीय भाषेत व्हीटीबीएस (VTBS) असं म्हटलं जातं. अशा स्थितीत संबंधित रुग्णाला वेळेत इलेक्ट्रिक शॉक दिला गेला नाही, तर त्याचा मृत्यू होतो.

ट्रेंडिंग बातमी - Prakash Ambedkar Hospitalized : प्रकाश आंबेडकरांना हृदयविकाराचा झटका, आजच अँजिओग्राफी होणार

कार्डिअॅक अरेस्टमध्ये हृदयाचा रक्तपुरवठा पूर्णत: बंद होतो. हृदयात वेंट्रिक्युलर फायब्रिलेशन निर्माण झाल्याने त्याचा परिणाम हृदयाच्या ठोक्यांवर होतो. त्यामुळे कार्डिअॅक अरेस्टमध्ये काही मिनिटातंच मृत्यू होऊ शकतो.कार्डिअॅक अरेस्ट अचानक येत असला तरी ज्यांना हृदयाचा आजार आहे, त्यांच्यात कार्डिअॅक अरेस्टची शक्यता अधिक असते.कधी कधी कार्डिअॅक अरेस्ट येण्याआधी छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत धडधड होणे, चक्कर येणे, शुद्ध हरपणं, थकवा येणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणं यांसारखी लक्षणं आढळतात.

ट्रेंडिंग बातमी -  प्रकाश आंबेडकरांच्या तब्बेतीबाबत मोठी अपडेट, सुजात आंबेडकरांनी काय आवाहन केलं?

वरील लक्षणे दिसताच रुग्णाला कार्डियोपल्मोनरी रेसस्टिसेशन (सीपीआर) दिलं जातं. जेणेकरुन त्याच्या हृदयाचे ठोके सामान्य करता येतील. याच्या रुग्णांना 'डिफायब्रिलेटर'द्वारे वीजेचा झटका देऊन हृदयाचे ठोके सामान्य करण्याचा प्रयत्न केला जातो.जितक्या लवकर शक्य असेल तितके लवकर सीपीआर सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. तसे केल्यास व्यक्तीचे प्राण वाचवले जाण्याची शक्यता तिपटीने वाढते. यामध्ये छातीच्या खालून तिसऱ्या हाडावर (स्टर्नम) किंवा छातीच्या मध्यभागी दोन्ही हातांच्या तळव्यांनी जोराने दाब दिला जातो (दर मिनिटाला 100-120 वेळा दाबले जाते). त्यामुळे हृदयातून शरीरातील प्रमुख अवयवांना रक्तपुरवठा सुरु होऊ शकतो.  

ट्रेंडिंग बातमी - 'देवेंद्र तात्यांनीच मला सर्व शिकवलं' जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं

कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक दोन्ही एकसारखे दिसतात. पण हे दोन्ही खूप वेगळे आहेत. हृदयविकाराचा झटका, ज्याला मायोकार्डियल इन्फ्रक्शन म्हणतात. झटका आल्यावर हृदयात रक्त प्रवाहात अचानक अडथळा निर्माण होतो. जेव्हा हृदयाच्या एखाद्या भागामध्ये रक्तप्रवाह कमी होतो किंवा नसतो तेव्हा इन्फ्रक्शन होते. म्हणजेच हृदयाचे काम सुरू असले तरी ते सक्षमपणे काम करत नसते. तर कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय अचानक धडकणे बंद होते. सहसा हे हृदयाच्या 'विद्युत' प्रणालीतील समस्येमुळे होते. हृदयाची धडधड थांबताच मेंदूसह संपूर्ण शरीरात रक्त वाहत नाही. त्यामुळे समस्या वाढते.

हृदय रोगाचे निदान करण्यासाठी वैद्यकीय इतिहास आणि  शारीरिक तपासण्या सोबत बऱ्याच तपासण्या केल्या जातात त्या खालील प्रमाणे आहेत:

* कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसरॉईड्सची  पातळी तपासण्यासाठी रक्तताची तपासणी.
* स्ट्रेस टेस्ट.
* इलेकट्रोकार्डिओग्रॅम (ईसीजी).
* इकोकार्डिओग्रॅम (2 डी एको).
* टिल्ट चाचणी.
* इलेकट्रॉफिसिओलॉजिक चाचणी.
* कोरोनरी अँजिओग्राम.
* सीटी (संगणकीय टोमोग्राफी) स्कॅन.


कसा असावा आहार

तुमच्या आहारात ताजी फळे फळ आणि भाज्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. कारण त्यामध्ये जीवनसत्व, खनिज आणि फायबर यांचा समावेश असतो जे  हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. आहारात प्रथिनांचा पुरेसा समावेश असणे गरजेचे आहे. वारंवार एकाच तेलात तळलेले पदार्थ खाणे टाळा. त्याच्याऐवजी ओमेगा 3 फॅटी ॲसिड किंवा सॅच्युरेटेड फॅट असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

उपचार पध्दती - 

साधारपणे हार्ट अटॅक आलेल्या रूग्णाला दोन प्रकारच्या ट्रीटमेंट दिल्या जातात. त्यामध्ये एक मेडिकल ट्रिटमेंट आणि दुसरी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी यांसारख्या ट्रिटमेंट दिल्या जातात. मेडिकल ट्रिटमेंट मध्ये हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये झालेल्या गाठी काढल्या जातात. पण रुग्णाला छातीत दुखण्याचा त्रास झाल्याच्या 3 ते 6 तासात त्याचा उपयोग होतो. बऱ्याचदा ही वेळ मर्यादा पाळली जात नसल्यामुळे रुग्णांना त्याचा फारसा उपयोग होत नाही.

आपल्या हृदयात 4 मुख्य भाग असतात जे रक्ताभिसरण क्रियेचे काम करतात. हृदयाला रक्तपुरवठा करण्याचे काम कोरोनरी आर्टरी (रक्तवाहिन्या) करतात. या रक्तवाहिन्या जेंव्हा निमुळत्या होतात (ज्याला आपण हृदयातील ब्लॉकेज म्हणतो) तेंव्हा हृदयाला रक्तपुरवठा कमी होऊ लागतो व त्यामुळे साहजिकच हृदयाचे कार्य मंदावते. हार्ट अटॅक येण्याचे हे सर्वसाधारण कारण आहे. तसेच हृदयातील अजून काही ठिकाणी होणारे बिघाडही हृदयाच्या समस्यांसाठी जबाबदार असू शकतात. 

हृदयाच्या बाबतीत सर्वाधिक ऐकिवात येणारी शस्त्रक्रिया म्हणजे बायपास सर्जरी म्हणजेच वैद्यकीय भाषेत कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (CABG). यात कोरोनरी आर्टरीचे काम मंदावल्यामुळे त्याठिकाणी शरीरातील दुसरी नस वापरून कोरोनरी आर्टरीला बायपास करण्यात येते म्हणजेच शरीरातील दुसरी नस कोरोनरी आर्टरीचे कार्य पार पाडते. ह्यासाठी सामान्यतः पायातील नसेचा वापर केला जातो. ह्या शस्त्रक्रियेआधी ईसीजी, इकोकार्डिओग्रॅम, अँजिओग्राफी, छातीचा एक्स रे, रक्त व लघवीची तपासणी इत्यादी चाचण्या, रक्तवाहिन्यांतील बिघाडाचे स्वरूप व रुग्णाची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन मगच डॉक्टर सर्जरीचा सल्ला देतात.

रक्तवाहिन्यांच्या अडथळ्यामुळे, हृदयाच्या स्नायूमध्ये अनेक वेळा रक्त आणि ऑक्सिजनचे संचलन थांबते किंवा कमी होते, ही स्थिती बरीच धोकादायक असू शकते. आजाराची तीव्रता लक्षात घेऊन त्याला बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. या शस्त्रक्रियेद्वारे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा बायपास केला जातो. हृदयविकाराचा झटका आणि एनजाइनासारख्या गंभीर आजारांच्या बाबतीत अशा शस्त्रक्रियेची आवश्यकता असू शकते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: