जाहिरात

Chhattisgarh Naxalites surrender: छत्तीसगडसाठी ऐतिहासिक दिवस! 200 हून अधिक कुख्यात नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

नॉर्थवेस्ट सब झोनल ब्युरो प्रमुख असलेला माओवादी कमांडर रुपेश आणि माढ डिव्हिजन प्रमुख राणिता या आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांच्या यादीत प्रमुख नावे आहेत.

Chhattisgarh Naxalites surrender: छत्तीसगडसाठी ऐतिहासिक दिवस! 200 हून अधिक कुख्यात नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

Chhattisgarh Naxalites surrender: छत्तीसगडसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. छत्तीसगढ येतील जगदलपूर येथे 153 शस्त्रांसह एकूण 208 नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केले आहे. यात 98 पुरुष आहेत. नक्षलवादी शस्त्रे समर्पण केल्यानंतर पुन्हा मुख्य प्रवाहात सामील होतील. जगदलपूर येथे होणारा हा आत्मसमर्पण सोहळा छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडेल. येत्या काही दिवसांत 150 ते 200 माओवादी आत्मसर्पण करणार असल्याचे NDTV मराठी ने कालच स्पष्ट केले होते.

नॉर्थवेस्ट सब झोनल ब्युरो प्रमुख असलेला माओवादी कमांडर रुपेश आणि माढ डिव्हिजन प्रमुख राणिता या आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांच्या यादीत प्रमुख नावे आहेत. 21 मे रोजी छत्तीसगढ येथील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात पोलीस चकमकीत नंबाला केशवराजू उर्फ बसवराज याच्या मृत्यूनंतर माओवादी कॅडरला जबरदस्त मानसिक हादरा बसला होता. मात्र त्याआधी एप्रिल महिन्यापासून रुपेश केंद्र सरकारसोबत शस्त्रसंधी आणि शांती वार्ता व्हावी अशा विचारांची मांडणी करत होता. आत्मसर्पण करण्याच्या भूपतीच्या भूमिकेचे त्याने समर्थन केले होते.

(नक्की वाचा-  Who is Tarakka: कोण आहे तारक्का? जिच्या प्रेमाखातर भुपतीने केले आत्मसमर्पण)

रुपेश याच्याकडे नक्षलवाद्यांच्या भरती, संयोजन आणि प्रचार विभागाचे दायित्व होते. त्याने काही महिन्यांपूर्वी पत्र लिहून आत्मसर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्याचे रँकमध्ये प्रमोशन करण्यात आले, तरी त्याची शस्त्रे ठेवण्याची मानसिकता बदलली नाही. 

मुख्य म्हणजे गेले दोन दिवस छत्तीसगड येथील जंगलातून हाती किंवा खांद्यावर बंदुकी घेऊन बाहेर पडत असलेल्या माओवादी कॅडरची छायाचित्रे आणि व्हिडिओज छत्तीसगढ येथील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. डोंगर टेकड्या आणि घनदाट जंगलांच्या पार्श्वभूमीवर झाडांच्या गर्दीतून माओवादी कॅडर यात एक रांगेत बाहेर निघत असलेले दिसत आहेत. यात महिलांचा देखील समावेश आहे. या सर्वांचा आज ऐतिहासिक आत्मसर्पण सोहळा घेण्यात येत आहे. 

(नक्की वाचा -  Railway Ticket Booking: पोस्ट ऑफिसमधून बूक करता येणार तिकिट; महाराष्ट्रात कुठे-कुठे सुविध उपलब्ध)

या घटनेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'नक्षलवादाविरुद्धच्या लढाईतील एक ऐतिहासिक दिवस' असे वर्णन केले आहे. अमित शहा यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घोषणा केली की, “अबूझमाड आणि उत्तर बस्तर, जी एकेकाळी नक्षलवादाची तळे होती, ती आज नक्षलवादी दहशतीपासून मुक्त घोषित करण्यात आली आहेत. नक्षलवादाचा थोडासा अंश आता केवळ दक्षिण बस्तरमध्येच शिल्लक आहे, तोही सुरक्षा दलांकडून लवकरच पुसून टाकला जाईल.”

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com