
राहुल कुलकर्णी, पुणे
Pune News : वैष्णवी हगवणेच्या मृ्त्यूनंतर हगवणे कुटुंबीयांचे इतर कारनामे देखील समोर येत आहे. हगवणे बंधूंना बंदूकाचा परवाना कसा मिळाला याबाबतची आता चर्चा सुरु आहे. बंदूकीचा परवानाप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी हगवणे बंधूंना परवाना नाकारला होता हे उघड झालं आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात शशांक आणि सुशील हगवणेला पिस्तूल परवाना मिळवण्यासाठी कुणी मदत केली? याचा देखील शोधला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हगवणे बंधुंना पिस्तुलाचा परवाना कसा मिळाला?
29 जून 2022 रोजी, सुशील हगवणे यांनी पिस्तूल परवान्यासाठी पुणे अधीक्षक कार्यालयात अर्ज केला होता. जो पोलिसांनी नाकारला कारण त्याच्या जीवाला कोणताही धोका नव्हता. मात्र सुशीलने पुणे शहर पोलीस मुख्यालयात पुन्हा अर्ज केला आणि त्याला परवाना मिळाला.
(नक्की वाचा- हगवणे कुटुंबीयांना केलेली मदत भोवली? IPS जालिंदर सुपेकरांची ‘डाऊनग्रेड' बदली)
सुशीलने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये भाडे करार दाखवून परवाना मिळवला. त्याने 29 सप्टेंबर 2022 रोजी अर्ज केला आणि नोव्हेंबरमध्ये त्याला परवाना मिळाला. शशांक हगवणे याने वारजे पोलीस स्टेशनमध्ये भाडे करार सादर करून परवाना मिळवला. त्याने 13 ऑक्टोबर 2022 रोजी अर्ज केला आणि नोव्हेंबरमध्ये त्याला परवाना मिळाला होता.
या दोघांना परवाना मिळवण्यासाठी त्यांच्या पत्नींनी एनओसी दिली. तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या काळात हे परवाने देण्यात आले होते. कारागृह सुधार विभागाचे महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचे नाव देखील या प्रकरणात आले आहे. कारण त्यांच्या सहीशिवाय परवाना मिळू शकत नव्हता.
( नक्की वाचा : Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं )
पोलिसांनी आधी खातरजमा न करता परवाने दिले आणि आता ते स्वतःची चूक सुधारत आहेत. लायसन्स देताना पोलीस आयुक्त, अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि लायसन्स विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सही केली. जालिंदर सुपेकर त्यावेळेस अतिरिक्त पोलीस आयुक्त होते.
सुशीलने भाडे करार केला आणि लगेच परवान्यासाठी अर्ज केला, ज्यामुळे संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी वेळेत कारवाई न केल्यामुळे 2025 पर्यंत हे प्रकरण चालू राहिले. वैष्णवीच्या मृत्यूनंतर या भानगडी आता बाहेर येत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world