जाहिरात

Big News: महाराष्ट्रात 34 हजार कोटींची गुंतवणूक, 33 हजार रोजगार निर्मिती, 17 सामंजस्य करार

उद्योगांसाठी जमीन, परवानग्या आणि इतर मंजुरी तातडीने मिळवून देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे असं ही ते म्हणाले.

Big News: महाराष्ट्रात 34 हजार कोटींची गुंतवणूक, 33 हजार रोजगार निर्मिती, 17 सामंजस्य करार
मुंबई:

गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज तब्बल 17 सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारांची एकूण किंमत सुमारे 33,768.89 कोटी रुपये आहे. त्यातून राज्यात सुमारे 33 हजार 483 रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस व ट्रक्स, संरक्षण व त्यासंबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, कोकण अशा सर्वच भागांमध्ये उद्योग उभारणीची संधी उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सहज आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी शासन वचनबद्ध आहे. सामंजस्य करार करून न थांबता गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील. याबाबत कुठेही अडथळा येणार नाही. फडणवीस यांनी मैत्री पोर्टल (Maitri Portal) या वन-स्टॉप संकल्पनेचा विशेष उल्लेख यावेळी केला. उद्योगांसाठी जमीन, परवानग्या आणि इतर मंजुरी तातडीने मिळवून देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे असं ही ते म्हणाले. 

नक्की वाचा - प्रेम होतं सार्थकवर, पण लग्न झालं करणसोबत; 7 दिवसांनी घरी परतलेल्या श्रद्धाची कहाणी एका क्षणात बदलली

ऊर्जाविषयक निर्णयांचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, राज्यात नुकताच 5 वर्षांचा मल्टी-इयर टॅरिफ मंजूर झाला आहे. वीजदर वर्षागणिक कमी होणार आहेत. पूर्वी दरवर्षी वीजदर 9 टक्क्यांनी वाढत असत, पण आता विजेचे दर कमी होणार आहेत. हे उद्योगांसाठी मोठे दिलासादायक ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा जीवनचक्र (Investment Life Cycle) राज्य सरकारने स्थिर आणि अंदाजपत्रित ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वृद्धिंगत होईल.

नक्की वाचा - ह्रदयद्रावक! अमेरिकेत रस्त्यावर 'गतका' करणाऱ्या शीख तरुणाला पोलिसांनी गोळ्या घातल्या, पाहा Video

जवळपास वेगवेगळ्या 17 कंपन्यांबरोबर हा करार करण्यात आला आहे.  या सामंजस्य करारादरम्यान मुख्य सचिव राजेश कुमार, उद्योग सचिव डॉ.पी. अन्बळगन, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोना, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या करारामुळे महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात आणखी मजबूत होणार आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com