
अमजद खान
शिळफाटा मार्गावरील देसाई-निळजे-काटई (पलावा) या अत्यंत महत्त्वाच्या उड्डाणपुलाच्या कामात होत असलेल्या ढिसाळपणा, अर्धवट स्थिती आणि वाहतुकीस होणारा त्रास लक्षात घेता, माजी आमदार राजू पाटील यांनी 1 जून रोजी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळीच पुलाच्या कामाची गुणवत्ता ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याच निरीक्षणाच्या आधारावर 3 जून रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून व्हीजेटीआय संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची अधिकृत मागणी त्यांनी केली होती. या मागणीची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर 5 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आदेश काढण्यात आले आहे. त्यानुसार व्हीजेटीआय संस्थेमार्फत ऑडिट करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. तसेच, यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. त्यामुळे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांनी या पुलाबाबत वारंवार आवाज उचलला आहे.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
या पुलाच्या कामावर केवळ एका महिन्यात खड्डे पडलेले दिसत आहेत. जे कामाच्या गंभीर हलगर्जीपणाचे व निकृष्ट दर्जाचे प्रतिक आहेत असा आरोपही पाटील यांनी केला होता. अशा परिस्थितीत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी वेळेवर घेतलेली तांत्रिक आणि सार्वजनिक दृष्ट्या सजग भूमिका योग्य आणि आवश्यक ठरल्याची चर्चा आहे. यापूर्वीही, कल्याण-शिळ रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत हरकत घेतल्यानंतर 30 पॅनल बदलण्याची नामुष्की ठेकेदारावर आली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world