जाहिरात

Dombivli News : कल्याण-शीळ रोडवर 3 दिवस Mega Traffic Block; कोणत्या वाहनांना कुठे प्रवेश बंद? वाचा सविस्तर

Dombivli News :  कल्याण-शीळ रोडवरील निळजे पूलाची (Nilaje Bridge) उंची वाढवण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे.

Dombivli News : कल्याण-शीळ रोडवर 3 दिवस Mega Traffic Block; कोणत्या वाहनांना कुठे प्रवेश बंद? वाचा सविस्तर
Dombivli News : या कालावधीमध्ये वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.
डोंबिवली:

Dombivli News :  दिल्ली ते जेएनपीटी डेडीकेट फ्रेट कॉरिडोर रेल्वे प्रकल्पाचे (Dedicated Freight Corridor Railway Project) काम प्रगतीपथावर असल्याने, कल्याण-शीळ रोडवरील निळजे पूलाची (Nilaje Bridge) उंची वाढवण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे या पुलावरून होणारी वाहतूक उद्यापासून तीन दिवस ( 7 नोव्हेंबर (November) ते 9 नोव्हेंबर (November) )  पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून (Traffic Control Department) वाहतुकीत मोठे बदल (Major Traffic Diversions) करण्यात आले आहेत. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊनच प्रवास सुरू करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अवजड वाहनांसाठी (Heavy Vehicles) महत्त्वाचे वाहतूक बदल

कल्याण-शीळ रोडवरील निळजे पुलावर काम सुरू असल्याने, सहाचाकी (Six-Wheeler) आणि जड-अवजड (Heavy and Oversized) वाहनांच्या मार्गात खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

मुंब्रा-कल्याण फाट्याकडून कल्याणकडे येणारी वाहने

या वाहनांना कल्याण फाटा (Kalyan Phata) येथे प्रवेश बंद आहे.

पर्यायी मार्ग: कल्याण फाटा, शीळ फाटा, मुंब्रा बायपास (Mumbra Bypass), खारेगाव नाका (Kharegaon Naka) मार्गे इच्छित स्थळी जातील.

( नक्की वाचा : Dombivli News : गुड न्यूज! फक्त 7 महिने थांबा, कल्याण-डोंबिवलीकरांची मोठ्या वाहतूक कोंडीतून होणार कायमची सुटका )
 

कल्याणकडून कल्याण फाट्याकडे जाणारी वाहने

या वाहनांना काटई चौकात (Katai Chowk) प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग: काटई चौक, बदलापूर चौक (Badlapur Chowk), खोणी नाका (Khoni Naka), तळोजा एमआयडीसी (Taloja MIDC) मार्गे जातील.

नवी मुंबई/तळोजा एमआयडीसीकडून काटई चौकाकडे येणारी वाहने:

निसर्ग हॉटेलजवळ (Nisarg Hotel) प्रवेश बंद.

पर्यायी मार्ग: निसर्ग हॉटेल येथून उजवीकडे वळण घेऊन बदलापूर पाईपलाईन (Badlapur Pipeline), नेवाळी (Newali) मार्गे जातील.

( नक्की वाचा : Mumbai Local Train: ऐन गर्दीच्या वेळी लोकल ठप्प! CSMT वर कर्मचाऱ्यांचे अचानक आंदोलन, ठाण्यातही रेल रोको )
 

अंबरनाथ/बदलापूरकडून काटई नाकाकडे येणारी वाहने:

खोणी नाका (Khoni Naka) येथे प्रवेश बंद आहे.

पर्यायी मार्ग: खोणी नाका येथून डावीकडे वळण घेऊन तळोजा (Taloja) मार्गे जातील.

पनवेल/नवी मुंबई (महापे मार्गे) कडून कल्याण-शीळफाटा जंक्शनकडे येणारी वाहने:

पर्यायी मार्ग: कल्याण जंक्शन, शीळफाटा, मुंब्रा बायपास, खारेगाव टोलनाका या मार्गे जातील.

हलक्या वाहनांसाठी (Light Motor Vehicles) वाहतुकीचे बदल

कल्याणहून शिळफाट्याकडे जाणारी वाहने (कार, बाईक) यांना निळजे कमानीजवळ (Nilaje Arch) प्रवेश बंद आहे.

पर्यायी मार्ग: निळजे कमानीजवळून उजवीकडे वळण घेऊन लोढा पलावा (Lodha Palava) कडून कल्याणकडे येणाऱ्या मार्गाने महालक्ष्मी हॉटेलकडे (Mahalakshmi Hotel) जाऊन पुढे जातील.

पलावा (Palava) परिसरातून कल्याणकडे जाणारी वाहने:

लोढा पलावा, कासाबेला, लोढा हेवन (Lodha Heaven) आणि एक्सपीरीया मॉल (Xperia Mall) कडून येणाऱ्या वाहनांना पुलाच्या चढणीला प्रवेश बंद.

पर्यायी मार्ग: कल्याण-शीळ रोडने शिळफाट्याच्या दिशेने देसाई खाडी पूल (Desai Creek Bridge) ओलांडून सरस्वती टेक्सटाईलसमोरून (Saraswati Textile) उजवीकडे यू-टर्न (U-Turn) घेऊन नव्या पलावा फ्लायओव्हरवरून (New Palava Flyover) मार्गस्थ होतील.

नवी मुंबईकडून कल्याण फाटा-कल्याणच्या दिशेने जाणारी हलकी वाहने:

पर्यायी मार्ग: कल्याण फाटा, शीळ फाटा, दिवा (Diva), आगासन फाटक (Agasan Gate), दिवा-संदप रोड (Sandap Road), मानपाडा (Manpada) व त्यानंतर कल्याण-शीळ रोडचा वापर करावा.

ठाण्याकडून कल्याण फाटाकडे येणारी हलकी वाहने

पर्यायी मार्ग 1: नाशिक मार्ग (Nashik Road), माणकोली (Mankoli), मोठा गाव (Motha Gaon), डोंबिवली (Dombivli) मार्गे.

पर्यायी मार्ग 2: नाशिक मार्ग, राजनोली बायपास (Rajnoali Bypass), कोनगाव (Kongaon), कल्याण मार्गे.

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकडून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी हलकी वाहने

पर्यायी मार्ग: चक्की नाका (Chakki Naka), मलंग रोड (Malang Road), नेवाळी नाका (Newali Naka) येथे उजवीकडे वळून बदलापूर पाईपलाईन, खोणी नाका, तळोजा एमआयडीसीकडे मार्गस्थ व्हावे.

कल्याण-डोंबिवलीहून ठाण्याकडे जाणारी हलकी वाहने

पर्यायी मार्ग: डोंबिवली, मोठागाव, ठाकुर्ली (Thakurli), माणकोली नाका, दुर्गाडी नाका (Durgadi Naka), कोनगाव, नाशिक-मुंबई महामार्गाने (Nashik-Mumbai Highway) जावे.

या बदलांमुळे प्रवासात वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com