जाहिरात

KDMC अधिकाऱ्यावर महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; शिवसेना महिला आघाडी आक्रमक

KDMC News : केडीएमसीच्या ब प्रभागातील पाणी पुरवठा खात्यातील अधिकारी वाळूंज यांनी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

KDMC अधिकाऱ्यावर महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; शिवसेना महिला आघाडी आक्रमक

अमजद खान, कल्याण

कल्याण डोंबिवली महापालिकेतील (KDMC) पाणी पुरवठा विभागातील एका अधिकाऱ्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुनिल वाळूंज यांनी एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या कुटुंबांवर पुढे काही करु नये यासाठी दबाव टाकला, असा आरोप आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने वाळूंज यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत वाळूंज यांच्या विरोधात तात्काळ कारवाई केली जाईल असे केडीएमसी सचिवांनी आश्वासन दिले आहे. दोन दिवसात कारवाई झाली नाही तर पुढे आम्ही काय करतो असा सज्जड इशारा शिवसेना महिला आघाडीने  केडीएमसी प्रशासनाला देण्यात आला आहे. 

(नक्की वाचा- Mumbai Air Pollution : मुंबईतील हवेचा दर्जा ढासळला; प्रदूषण रोखण्यासाठी BMC ची नियमावली)

कल्याणमधील शिवसेना पदाधकारी छाया वाघमारे, नितू कोटक आणि नेत्रा उगले यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी सचिव किशोर शेळके यांची आज भेट घेतली. महिला शिवसेना शिष्टमंडळ केडीएमसी आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते. आयुक्त इंदूराणी जाखड या बाहेर असल्याने शिष्टमंडळाने सचिव शेळके यांची भेट घेतली. 

केडीएमसीच्या ब प्रभागातील पाणी पुरवठा खात्यातील अधिकारी वाळूंज यांनी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अधिकाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला आघाडीने दिला आहे. 

(नक्की वाचा-  1 जानेवारीपासून Whatsapp 'या' स्‍मार्टफोन्‍सवर चालणार नाही, लिस्टच आली समोर)

केडीएमसीतील महिला कर्मचाऱ्यांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही. त्यांच्या पाठीसी शिवसेना महिला आघाडी खंभीरपणे उभी आहे. असे कोणी महिलांसोबत करत असेल तर त्या अधिकाऱ्याचे डोळे काढून घेणार. वाळूंजच्या विरोधात कारवाई झाली नाही तर पुढे का करु ते बघा असा इशारा महिला आघाडीने दिला आहे. सचिव शेळखे यांनी सांगितले की, संबंधित तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. वाळूंजवर करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. त्यांच्या विरोधात लवकर कारवाई केली जाईल. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com