जाहिरात

कुर्ला बस अपघात प्रकरण, चालक संजय मोरेने सांगितलं अपघात नेमका कसा झाला?  

Kurla Accident Update : संजय मोरेला 40 हून अधिक गाडी चालवण्याचा अनुभव असला तरी त्याने आधी कधी ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती. 1 डिसेंबरला पहिल्यांदाच त्याने ऑटोमॅटिक बस चालवली. बसच्या तपासणीत बसचे ब्रेक्स काम करत असल्याचं निष्पन्न झालं आहे. 

कुर्ला बस अपघात प्रकरण, चालक संजय मोरेने सांगितलं अपघात नेमका कसा झाला?  

कुर्ला बेस्ट बस अपघातात 7 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 49 जण जखमी झाले आहे. या प्रकरणी बसचा चालक संजय मोरे याला पोलिसांना अटक केली असून ही घटना नेमकी कशी झाली याचा तपास सुरु आहे. संजय मोरेला ऑटोमॅटिक बस चालवण्याच्या अनुभव नसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसा तपासात समोर येत आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑटोमॅटिक गाडी चालवण्याची सवय नसल्याने गोंधळल्याचे संजय मोरेचे पोलीस चौकशीत सांगितलं आहे. क्लच नसलेल्या गाड्या चालवणं गैरसोईचं असल्याचं संजय मोरेने सांगितलं आहे. गाडी चालवताना क्लच समजून अॅक्सीलेटर दाबल्याचे चालक संजय मोरेने सांगितलं आहे. 

(नक्की वाचा-  Kurla Bus Accident : आफरीनच्या पहिल्या नोकरीचा पहिला दिवस ठरला शेवटचा, रस्त्यावरुन चालणं ही चूक होती का?)

संजय मोरेला 40 हून अधिक गाडी चालवण्याचा अनुभव असला तरी त्याने आधी कधी ऑटोमॅटिक बस चालवली नव्हती. 1 डिसेंबरला पहिल्यांदाच त्याने ऑटोमॅटिक बस चालवली. बसच्या तपासणीत बसचे ब्रेक काम करत असल्याचं निष्पन्न झालं आहे. 

अनेक वाहनांना चिरडलं

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात बस चालकाने तब्बल 30 ते 40 विविध वाहनांना धडक दिली.  काही जण बसच्या चाकाखाली आले तर काही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर केला. ही दृश्य थरारक आणि अंगावर काटा आणणारी आहेत. बस अपघातानंतर चालकाला पोलिसांनी अटक केली असून 21 डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. 

(नक्की वाचा - बसमध्ये बिघाड नाही, चालकानं मद्यपान केलं नव्हतं; कुर्ला डेपोजवळच सुरू झालं होतं अपघाताचं सत्र?)

बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता

बसची फॉरेन्सिक पथकानं तपासणी केली असता बसमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नसल्याचंही दिसून आलंय. दरम्यान 49 जखमींना कुर्ला आणि घाटकोपरमधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या सर्व प्रकरणात सामान्यांनी नाहक जीव गमावला. या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com