
Latur News : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील 35 वर्षीय तरुण भरत महादेव कराड याने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे आज, 12 सप्टेंबर 2025 रोजी तातडीने लातूरला जाऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत.
भरत कराडेने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, "मी भरत महादेव कराड आताच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळे ओबीसींचे आरक्षण कायमस्वरुपी संपवले आहे. मी वेळोवेळी ओबीसी आक्षण बचाव आनंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करून ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी माझे जीवन कायमस्वरूपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा."

या घटनेमुळे संपूर्ण मराठवाड्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी आजचे येवला मतदारसंघातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. ते विशेष विमानाने सकाळी 10 वाजता नाशिकहून लातूरला रवाना होणार आहेत.
(नक्की वाचा- Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं मिळणार? नियमावली जाहीर; वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस)
लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील भरत महादेव कराड या ३५ वर्षीय तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून मांजरा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. त्यास भावपूर्ण श्रद्धांजली!
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) September 11, 2025
या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या…
छगन भुजबळ यांचं ट्वीट
छगन भुजबळ यांनी ट्वीट करत म्हटलं की, "लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील भरत महादेव कराड या ३५ वर्षीय तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून मांजरा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. त्यास भावपूर्ण श्रद्धांजली! या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवार रोजी लातूर येथे या आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी जात आहे. सध्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात घडणाऱ्या घडामोडी सर्वसामान्य ओबीसीला अस्वस्थ करणाऱ्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण संविधान आणि कायद्यामुळे नक्की न्याय मिळेल,त्यासाठी लढावं लागणार आहे. त्याला आपण खंबीर आहोत. त्यामुळे कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये, असे महाराष्ट्रातील समस्त ओबीसी बांधवांना माझे कळकळीचे आवाहन आहे."
( नक्की वाचा : Maratha reservation : 'कुणबी' दाखल्यासाठी अर्ज कसा कराल? वाचा सरकारी GR मधील संपूर्ण माहिती, सोप्या शब्दात! )
ओबीसी नेत्यांसोबत करणार दौरा
मंत्री छगन भुजबळ यांचे सकाळी 10 वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते थेट वांगदरी गावी जाऊन स्वर्गीय भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. यावेळी त्यांच्यासोबत राज्यातील अनेक ओबीसी नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाचे सांत्वन केल्यानंतर ते पुन्हा नाशिकला (Nashik) परततील.
भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीत उडी घेऊन जीवन संपवल्याने या प्रश्नाची गांभीर्यता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या घटनेमुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, सरकारवर दबाव वाढला आहे.
अहमदपूरमध्येही एका तरुणाची आत्महत्या
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील 27 वर्षीय तरूण अभिजीत सोळंके या तरुणाने आयुष्य संपवल्याने घटना समोर आली आहे. अहमदपूर शहरात भाड्याने तो राहत होता, तिथेच गळफास लावून त्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. खंडाळी गावात कुनबी नोंदी नसल्याने अभिजीत तणावात असल्याचे नातेवाईकांकडून सांगीतले जात आहे. तर घटनेचा तपास अहमदपूर पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world