जाहिरात

Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवडकर दहशतीत! लहान मुलांची विषेश काळजी घ्या, वन विभागीच सूचना

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड, दुर्गा देवी टेकडी आणि रावेत परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्हीमध्ये बिबट्याची हालचाल कैद झाल्याने वनविभागाने शोधमोहीम सुरू केली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवडकर दहशतीत! लहान मुलांची विषेश काळजी घ्या, वन विभागीच सूचना

सूरज कसबे, पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोड येथील अमुनिशन फॅक्टरी, प्रसिद्ध दुर्गा देवी टेकडी, रावेत आणि म्हस्के वस्ती या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने शोधमोहीम हाती घेतली आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाली हालचाल

या परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याची हालचाल स्पष्टपणे कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे वनविभागाच्या पथकाने बिबट्याचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. अमुनिशन फॅक्टरीचा विस्तीर्ण परिसर आणि दुर्गा देवी टेकडीचा डोंगराळ भाग दाट झाडीचा असल्याने शोधकार्यात काही प्रमाणात आव्हाने येत आहेत. मात्र, वनविभागाचे कर्मचारी या भागात गस्त घालत आहेत.

(नक्की वाचा-  DMart VIDEO: डीमार्टमध्ये जात असाल तर सतर्क राहा! एक चूक महागात पडेल)

नागरिकांना खबरदारीचे आवाहन

बिबट्याचा वावर पाहता वनविभागाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे.  लहान मुले आणि पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी. परिसरात संशयास्पद हालचाल दिसल्यास किंवा बिबट्या दृष्टीस पडल्यास तातडीने वनविभागाशी किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.

(नक्की वाचा-  Dombivli News: खाऊ आणायला गेलेली आई आलीच नाही; 3 चिमुरड्यांचे रस्त्यावरच रडून-रडून हाल!)

सध्या वनविभागाकडून या भागात पिंजरे लावण्याची तयारी सुरू असून, बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com