जाहिरात

Cabinet Decisions: साताऱ्यात IT पार्कसाठी जमीन ते बायोगॅस धोरण; मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Cabinet Decisions : मुख्यमंत्री सचिवालयाने आज महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली. यात प्रामुख्याने राज्यस्तरीय 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) धोरण 2026' जाहीर करण्यात आले असून, यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Cabinet Decisions: साताऱ्यात IT पार्कसाठी जमीन ते बायोगॅस धोरण; मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. यामध्ये आज महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा करण्यात आली. प्रामुख्याने राज्यस्तरीय 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) धोरण 2026' जाहीर करण्यात आले असून, यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरण आणि राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांसाठी वेतन सुधारणा असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जनतेसाठी आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) धोरण, 2026

राज्यात हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी हे नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत चालू वर्षासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन केली जाईल. हे प्रकल्प पीपीपी (PPP) आणि हायब्रीड अन्युईटी तत्त्वावर राबवले जाणार आहेत. घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन होईल आणि हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात मोठी घट होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. 

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना मोठा दिलासा

उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) निर्देशानुसार मूळ वेतन दिले जाणार आहे. या शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आगामी पदभरती प्रक्रियेमध्ये अतिरिक्त गुण दिले जातील.

साताऱ्यात आयटी (IT) पार्कसाठी जमीन हस्तांतरण

सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी हा मोठा निर्णय आहे. सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय.टी. पार्कसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (MIDC) 42.55 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सातारा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला मोठी गती मिळणार असून, स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. 

(नक्की वाचा-  Pune News: रिंग रोडसाठी शेतकरी कुटुंबाला रस्त्यावर आणलं; डोळ्यासमोर संसार उद्ध्वस्त)

कमाल जमीन धारणा मर्यादा 

राज्यातील जमीन धारणा मर्यादेच्या नियमानुसार, 'भोगवटादार वर्ग – 2' मधून 'भोगवटादार वर्ग – 1' मध्ये जमिनीचे रूपांतर करण्याबाबतच्या अधिमुल्याची (Premium) पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच निर्गमित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com