LPG Cylinder : राज्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याच्या चर्चांना राज्य सरकारने पूर्णविराम दिला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात दिलेल्या माहितीचा पुनरुच्चार करत, अधिकाऱ्यांनी सांगितले की राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. अधिकाऱ्यांनी जनतेला एलपीजी सिलिंडरसाठी रांगेत उभे न राहण्याचं आवाहन केलं आहे. सिलिंडर घरी पोहोचवण्यासाठी फक्त ऑनलाइन बुकिंग करण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात 3.5 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. 3 एप्रिलपासून दररोज सरासरी 5.8 कोटी रिफिल झाले आहेत, तर जानेवारीमध्ये हा आकडा 5.9 कोटी होता, असे त्यांनी सांगितले. परंतु, समान पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शहरी भागांमध्ये 25 दिवसांचा बुकिंग निर्बंध कालावधी आहे. एकदा ऑर्डर दिल्यानंतर, सिलिंडर 3-4 दिवसांत पोहोचवला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
(नक्की वाचा- Kalyan-Dombivli Schools: कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण)
30 जूनपासून एलपीजी पुरवठा बंद?
ज्या शहरी भागांमध्ये पाईप नॅचरल गॅस (PNG) ची जोडणी उपलब्ध आहे किंवा जिथे पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तिथे 30 जून 2026 पासून घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद केला जाणार आहे. ज्या झोपडपट्टी भागात भौगोलिक कारणांमुळे पीएनजी लाईन टाकता येत नाही, तिथे एलपीजी पुरवठा सुरू राहील. राज्यात फेब्रुवारीपर्यंत 42.3 लाख पीएनजी जोडण्या होत्या. ज्यात गेल्या महिन्यात 73,000 ची भर पडली आहे.
मदतीसाठी व्हॉट्सॲप हेल्पलाईन
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. व्हॉट्सॲप हेल्पलाईनद्वारे 9769919221 या क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल. एलपीजी वाहने, गॅस एजन्सी आणि वितरण कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण दिले जात आहे. शहरी भागात न्याय्य वाटपासाठी 25 दिवसांच्या बुकिंग निर्बंधाचा नियम लागू आहे. बुकिंगनंतर 3 ते 4 दिवसांत सिलिंडर घरपोच मिळेल. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Pune News: स्वार्थासाठी आईनेच संपवलं 11 महिन्यांच्या लेकराला; हत्येचं कारण ऐकून पोलीसही सुन्न)
काळाबाजारावर कठोर कारवाई
इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध राज्याने मोठी मोहीम राबवली आहे. 53 एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले असून 36 जणांना अटक केली आहे. 3628 एलपीजी सिलिंडर आणि 71,565 किलो एलपीजी जप्त करण्यात आला आहे, ज्याची किंमत 2.40 कोटी रुपये आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world