जाहिरात

Rain Alert: दिवाळीनंतरही पावसाची बॅटिंग सुरुच राहणार! पुढील 4 दिवस या जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज

Rain Alert: शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पुढील चार दिवस विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Rain Alert: दिवाळीनंतरही पावसाची बॅटिंग सुरुच राहणार! पुढील 4 दिवस या जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Alert : राज्यात यावर्षी मे महिन्यात सुरु झालेला पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. मान्सूनने राज्याला रामराम ठोकला असला तरी, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढले आहे. या बदलामुळे राज्यात पुढील 4 दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरात जोरदार सरी 

डॉ. सुदीप कुमार, वैज्ञानिक, पुणे वेधशाळा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती राज्याच्या हवामानासाठी अनुकूल नाही. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, लक्ष्मीपूजनानंतरच्या दोन दिवसांत म्हणजे 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जोरदार सरी कोसळल्या. छत्रपती संभाजीनगर शहरात 25 ते 27 ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. तर हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की, 28 ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता जाणवते. 

(नक्की वाचा-  Satara Doctor case: ...तर साताऱ्यातील डॉक्टर तरुणीचा जीव वाचला असता, 4 महिन्यांपूर्वी काय घडलं होतं?)

पुणे वेधशाळेने वर्तवलेला जिल्हावार पावसाचा अंदाज 

  • 25 ऑक्टोबर: नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, वर्धा, नागपूर.
  • 26 ऑक्टोबर: मुंबई, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड.
  • 27 ऑक्टोबर: धुळे, मुंबई, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर.
  • 28 ऑक्टोबर: पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड.

शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पुढील चार दिवस विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com