रामराजे शिंदे, नवी दिल्ली
राज्यातील महायुती सरकार स्थापनेच्या दृष्टीने दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात ही बैठक पार पडली. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांनी आधीच पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल असं जाहीर केलं आहे. एकप्रकारे त्यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट झालं झालं आहे. मात्र त्याबदल्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला 12 मंत्रिपदे द्यावीत अशी मागणीअमित शाह यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानपरिषदेचे सभापती पद मिळावे अशी मागमी देखील एकनाथ शिंदे यांनी केली असल्याची माहिती समोर सूत्रांकडून मिळत आहे. गृह आणि नगरविकास यासह महत्त्वाच्या खाते शिवसेनेला द्यावेत. पालकमंत्रिपद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी विनंती शिंदेंनी अमित शाहांना केल्याची माहिती मिळत आहे.
(नक्की वाचा- '...म्हणून माझा पराभव', शहाजी बापू पाटील पहिल्यांदाच बोलले! शरद पवार, संजय राऊतांवर आरोप)
शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. महायुती म्हणून शिवसेना सोबत असल्याचं देखील पुन्हा एकदा एकनाथ शिंदेनी अमित शाहांना सांगितलं, असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
(नक्की वाचा- संसदेच्या अधिवेशनात 'इंडी' आघाडी अडचणीत, TMC कडून काँग्रेसची खरडपट्टी)
सूत्रांचाय माहितीनुसार दिल्लीच्या बैठकीत काय काय झालं?
- मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती.
- अमित शाहांसोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळाची रचना, खाती वाटप यांच्यावर चर्चा झाल्याची माहिती.
- एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करत मोठी खाती देण्यावर चर्चा.
- एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असाच फॉर्म्यूला निश्चित.
- एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्री होणार की इतर कुणी याबाबत अजूनही चर्चाच.
- शिवसेनेनं गृह, नगरविकास तसेच विधानपरिषदेचं सभापतीपद मागितल्याची माहिती.
- शिंदेंच्या सेनेनं एकूण 12 खाती मागितल्याची प्राथमिक माहिती.
- 6 आमदारांमागे एक मंत्रिपद असा खात्यांबाबत फॉर्म्यूला ठरल्याची माहिती.
- गृहमंत्रिपदावरुन भाजप, शिवसेनेत रस्सीखेच, गृहमंत्रिपद देण्यास भाजपचा नकार.
- प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता.