
Mandale to Chembur Metro to run by end of September : हार्बर लाइनवरील नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. या महिन्याच्या अखेरीत मंडाळे ते चेंबूरदरम्यान मेट्रो धावण्याची शक्यता आहे. बहुप्रतिक्षित डी. एन नगर ते मंडाळे मेट्रो 2 बी मार्गिकेचा पहिला टप्पा या महिन्यात दाखल होणार आहे. यासाठी मंडाळे ते चेंबूर (डायमंड गार्डन) मार्गावर कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी पथकाकडून तपासणी सुरू केली जाणार आहे. आज बुधवार, 10 सप्टेंबरपासून ही तपासणी सुरू केली जाणार आहे. सीएमआरएसने सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येईल.
कसा असेल हा मार्ग?
- डी.एन.नगर ते मंडाळे मेट्रो २ बी - २३.६ किलोमीटर
किती स्थानके असतील
- १९ स्थानके
या मार्गिकेसाठी किती खर्च
- सुमारे १०,९८६ कोटी खर्च
पहिल्या टप्प्यात कोणती मार्गिका सुरू होणार?
- मंडाळे ते डायमंड गार्डन चेंबूर
ही मार्गिका किती लांबीची आहे?
- ५.३ किलोमीटर लांबीची मार्गिका
पहिल्या टप्प्यात कोणत्या स्थानकांवर मेट्रो धावणार
- मंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन
जुलै महिन्यात सीएमआरएस पथकाने पहिल्या मार्गावर प्राथमिक तपासणी केली होती. यावेळी मार्गिकेच्या कामाबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. आता यात अंतिम तपासणी केली जाणार आहे. नव्या मेट्रोमुळे चेंबूर भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परिणामी रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world