जाहिरात

Manoj Jarange Maratha Morcha: आझाद मैदानात 5000 जणच आंदोलनाला बसतील, मनोज जरांगेंची मोठी घोषणा

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी दिली, ती आपल्याला काही जमत नाही. आम्ही कायद्याच्या अधीन राहून आंदोलन करू, पण आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करत राहणार, त्याची परवानगी द्यावी.

Manoj Jarange Maratha Morcha: आझाद मैदानात 5000 जणच आंदोलनाला बसतील, मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Manoj Jarange Maratha Morcha: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनासाठी पोलिसांनी दिलेल्या एका दिवसाच्या परवानगीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शांततापूर्ण आणि कायद्याचे पालन करून आंदोलन करू, पण जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी दिली, ती आपल्याला काही जमत नाही. आम्ही कायद्याच्या अधीन राहून आंदोलन करू, पण आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करत राहणार, त्याची परवानगी द्यावी.

(नक्की वाचा-  Manoj Jarange Patil Maratha Morcha : मोठी बातमी! जुन्नरमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकाचा हार्टअटॅकने मृत्यू)

5000 जण मुंबईत आंदोलन करतील

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांची संख्या आणि नियोजनाबद्दलही महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, "आपल्याला 5000 लोकांना परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी जागा दिली आहे तिथे 5000 जणच बसतील. याचा अर्थ, आझाद मैदानावर फक्त 5000 आंदोलक बसणार आहेत, असं देखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

मनोज जरांगे यांनी आंदोलनाचे सात टप्पे असतील असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यांनी सरकारला इशारा देत म्हटले की, "त्रास दिला तर उरलेले देखील मुंबईत येतील. जास्त त्रास दिला तर मराठा माय माऊली महाराष्ट्र जाम करतील." याचा अर्थ, सरकारने आंदोलकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. काहीही झाले तरी मी मुंबई सोडत नाही," असे ठामपणे सांगत मनोज जरांगे यांनी आपला निर्धार व्यक्त केला.

(नक्की वाचा-  Manoj Jarange Patil Maratha Morcha LIVE:जरांगे पाटील यांच्या मोर्चातील 3 वाहनांवर दगडफेक, मोठं नुकसान; एक जखमी)

CM देवेंद्र फडणवीसांना इशारा

मनोज जरांगे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. "सगळे मला वेडा म्हणतात, पण फडणवीस यांनाच माहिती आहे आपण काय रसायन आहे. तसेच त्यांनी फडणवीसांना आपल्या नादी न लागण्याचा सल्ला दिला.

अखेर मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले. "कोणीही नियमाचे उल्लंघन करायचे नाही. शांततापूर्वक मुंबईत येणार आहे. लोकशाहीचे पालन करणे गरजेचे आहे. शांततापूर्वक आंदोलन करायचे आहे. सरकारने 5000 लोकांना परवानगी दिलेली आहे तर 5000 लोक त्या ठिकाणी जाणार आहेत, कोणीही नियमाचे उल्लंघन करू नका," अशा शब्दांत मनोज जरांगेंनी सर्वांना सूचना केल्या आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com