जाहिरात

Pratap Sarnaik Buys Tesla Y: परिवहनमंत्र्यांनी विकत घेतली देशातील पहिली टेस्ला, किंमत पाहून थक्क व्हाल

मंत्री सरनाईक यांनी यावेळी म्हटलं की, आम्ही तुम्हाला उद्घाटन करताना सांगितले होते की, आम्ही इलेक्ट्रिक गाड्यांना प्राधान्य देतोय. टेस्लासारखी गाडी चांगली आहे, पूर्ण पैसे भरून आणि कोणत्याही सवलतीशिवाय मी ही गाडी घेतली आहे. मी

Pratap Sarnaik Buys Tesla Y: परिवहनमंत्र्यांनी विकत घेतली देशातील पहिली टेस्ला, किंमत पाहून थक्क व्हाल

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देशातील पहिली टेस्ला कार खरेदी केली आहे. सरनाईक यांनी मुंबईतील बीकेसी येथील टेस्ला शोरुममधून ही इलेक्ट्रिक कार विकत घेतली. यावेळी त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक हे देखील उपस्थित होते. टेस्लाचे 'मॉडेल वाय' (Tesla Model Y) खरेदी करताना कोणतीही सवलत न घेता संपूर्ण किंमत भरल्याचे स्पष्ट केले. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीला चालना देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

मंत्री सरनाईक यांनी यावेळी म्हटलं की, आम्ही तुम्हाला उद्घाटन करताना सांगितले होते की, आम्ही इलेक्ट्रिक गाड्यांना प्राधान्य देतोय. टेस्लासारखी गाडी चांगली आहे, पूर्ण पैसे भरून आणि कोणत्याही सवलतीशिवाय मी ही गाडी घेतली आहे. मी आनंदी आहे की राज्याचा परिवहन मंत्री म्हणून पर्यावरण पुरक गाडी घेतली आहे. पुढील १० वर्षात जास्तीत जास्त गाड्या या यायलाच हव्यात. पर्यावरण पुरक गाड्या जास्तीत जास्त येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचेही पर्यावरण पुरक गाड्या येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या गाड्यांना सर्व टोल नाक्यांवरही पर्यावरण पुरक गाड्यांना सूट दिली आहे. या कंपन्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

(नक्की वाचा- iPhone 17 Series: ॲपलच्या नव्या सीरिजच्या फोनच्या किमती किती असणार? चेक करा)

टेस्ला 'मॉडेल वाय' भारतातील किंमत आणि फीचर्स

टेस्ला 'मॉडेल वाय' ही एक आलिशान आणि पॉवरफुल इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. भारतात याची अंदाजित किंमत 70 लाख ते 1 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. हे मॉडेल अवघ्या 3.5 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास चा वेग पकडू शकते. बॅटरी रेंजबाबत सांगायचं तर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर हे मॉडेल सुमारे 514 किलोमीटरपर्यंत (km) प्रवास करू शकते.

कारच्या आत एक मोठी 15-इंच टचस्क्रीन आहे, ज्यावर सर्व कंट्रोल उपलब्ध आहेत. यात पारंपरिक डॅशबोर्ड किंवा बटणे नाहीत, ज्यामुळे इंटीरियर अतिशय आधुनिक दिसते. यात ऑटोपायलट सारखे प्रगत तंत्रज्ञान आहे, जे सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. हे तंत्रज्ञान गाडीला आपोआप लेनमध्ये ठेवते, वेग नियंत्रित करते आणि इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर राखण्यास मदत करते.

(नक्की वाचा-  WhatsApp जबरदस्त फीचर, आता AI मेसेज टाईप करण्यासाठी करणार मदत)

टेस्ला वाय मॉडेल उत्कृष्ट सुरक्षा रेटिंगसह येते, ज्यामुळे ती प्रवाशांसाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते. टेस्ला 'मॉडेल वाय'चे डिझाइन अतिशय आकर्षक आणि आधुनिक आहे. यात काचेचे मोठे छत आहे, ज्यामुळे आतील भाग खूप प्रशस्त वाटतो.

अल्प प्रतिसाद

जुलै महिन्यात भारतात विक्री सुरू करूनही, इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला आहे. ब्लूमबर्ग न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, टेस्लाला आतापर्यंत फक्त 600 हून अधिक गाड्यांसाठी ऑर्डर मिळाल्या आहेत. हा आकडा कंपनीच्या स्वतःच्या अपेक्षांपेक्षा खूपच कमी आहे. जागतिक स्तरावर टेस्ला दर चार तासांत अंदाजे 600 गाड्यांची डिलिव्हरी करते, त्या तुलनेत भारतातील हा आकडा खूपच नगण्य आहे.

जास्त किंमत प्रमुख अडथळा

टेस्लाने भारतात आपली एंट्री लेव्हलची कार 'मॉडेल वाय' सुमारे 70,000 डॉलर्स (सुमारे 60 लाख रुपये) मध्ये लॉन्च केली आहे. ही किंमत भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) सरासरी किमतीपेक्षा खूपच जास्त आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर लागणारे प्रचंड आयात शुल्क यामुळे टेस्लाच्या कारच्या किमती जास्त आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com