जाहिरात

iPhone 17 Series: ॲपलच्या नव्या सीरिजच्या फोनच्या किमती किती असणार? चेक करा

ॲपल कंपनी बेस स्टोरेज 128GB वरून 256GB पर्यंत वाढवत आहे. त्यामुळे, आयफोन 16 प्रोच्या 256GB व्हर्जनच्या तुलनेत ही किंमत जवळपास सारखीच आहे.

iPhone 17 Series:  ॲपलच्या नव्या सीरिजच्या फोनच्या किमती किती असणार? चेक करा

iPhone 17 Series : ॲपल कंपनी या महिन्यात 9 तारखेला आपली नवीन आयफोन 17 सीरिज लॉन्च करणार आहे. या सिरीजमध्ये आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स आणि आयफोन 17 एअर या मॉडेल्सचा समावेश असण्याची शक्यता आहे. लॉन्च होण्यापूर्वीच या नवीन आयफोनच्या किमती समोर आल्या आहेत. जेपी मॉर्गनच्या एका नवीन अहवालानुसार, किमतींमध्ये मोठी वाढ होईल अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात फक्त एकाच मॉडेलची किंमत वाढणार असल्याचे समोर आले आहे.

या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन 17 प्रो या मॉडेलच्या किमतीतच मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या मॉडेलची सुरुवातीची किंमत 1,099 डॉलर (सुमारे 96,839 रुपये) असण्याची शक्यता आहे. ही किंमत मागील वर्षाच्या तुलनेत 100 डॉलर (सुमारे 8,811 रुपये) जास्त आहे. मात्र, ही वाढ फक्त एकाच कारणाने होत आहे. ॲपल कंपनी बेस स्टोरेज 128GB वरून 256GB पर्यंत वाढवत आहे. त्यामुळे, आयफोन 16 प्रोच्या 256GB व्हर्जनच्या तुलनेत ही किंमत जवळपास सारखीच आहे.

(नक्की वाचा-  WhatsApp जबरदस्त फीचर, आता AI मेसेज टाईप करण्यासाठी करणार मदत)

इतर आयफोनची किंमत समान राहण्याची शक्यता

आयफोन 17 सिरीजमधील इतर मॉडेल्सच्या किमतींमध्ये फारसा बदल होणार नाही, अशी शक्यता आहे. आयफोन 17 या मॉडेलची सुरुवातीची किंमत आयफोन 16 च्या सुरुवातीच्या किमतीइतकीच म्हणजेच 799 डॉलर (सुमारे 70,404 रुपये) असण्याची शक्यता आहे.

आयफोन 17 एअर हा नवीन आयफोन 16 प्लसच्या जागी येईल. याची किंमत 949 डॉलर (सुमारे 83,620 रुपये) असू शकते, जी आयफोन 16 प्लसच्या किमतीपेक्षा सुमारे 50 डॉलर (सुमारे 4,406 रुपये) जास्त आहे. त्याच्या नवीन आणि स्लिम डिझाइनमुळे किंमत थोडी जास्त असेल. आयफोन 17 प्रो मॅक्स या मॉडेलच्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,199 डॉलर (सुमारे 1,05,659 रुपये) असण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा-  फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ही 5 फळं, आरोग्यावर होतो वाईट परिणाम)

या किमती केवळ अमेरिकेतील अंदाज आहेत. इतर देशांतील किमतींबद्दल अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही. ॲपलचा लॉन्च सोहळा जवळ आल्यामुळे, ग्राहक आता याकडे लक्ष देत आहेत की, नवीन आयफोन 17 सीरिज या वाढलेल्या किमतीनुसार योग्य अपग्रेड घेऊन येत आहे की नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com