राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना मदत; मनसेने 10 जागांवर ठाकरे गटाचा विजय केला सोपा

मनसेच्या उमेदवारांमुळे 10 जागांवर शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले. ज्याचा फायदा शिवसेना ठाकरे गटाला झाला. ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळालेली मते आणि विजयाचे अंतर हे मनसेच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा कमी होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. यंदा मनसेला एकदा आमदार निवडून आणता आला नाही. मात्र मनसेच्या हिंदुत्ववादी मराठी मतांचं विभाजन करण्यात यशस्वी ठरल्याचं निकालातून समोर आलं आहे. याचा सर्वाधिक फटका शिवसेना शिंदे गटाला बसला आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मनसेच्या उमेदवारांमुळे 10 जागांवर शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले. ज्याचा फायदा शिवसेना ठाकरे गटाला झाला. ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळालेली मते आणि विजयाचे अंतर हे मनसेच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा कमी होते. ठाकरे गटाच्या 20 जागांपैकी वरळी, वांद्रे पूर्व आणि माहीमच्या प्रतिष्ठेच्या जागांसह 10 जागांवर मनसेच्या उमेदवाराला मिळालेली मते ही विजयी उमेदरावांच्या फरकापेक्षा जास्त आहेत. वणी, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, वर्सोवा, कलिना, वांद्रे पूर्व, माहीम, वरळी आणि गुहागर या 10 जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेचा फायदा झाला. 

(नक्की वाचा- VIDEO : "थोडक्यात वाचलास, दर्शन घे दर्शन", अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला)

या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार सहभागी झाले नसते तर शिवसेनेला (यूबीटी) केवळ 10 जागा मिळाल्या असत्या, त्यामुळे निवडणुकीच्या निकालात लक्षणीय बदल झाला असता आणि एकनाथ शिंदे गटाला 10 जागा मिळाल्या असत्या हे स्पष्ट आहे. अतिरिक्त जागा.

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार उभे केले नसते तर ठाकरे गटाला केवळ 10 जागा मिळाल्या असत्या. त्यामुळे निवडणुकीत महायुती मोठं यश मिळालं असलं मनसे निवडणुकीत उतरली नसती तर एकनाथ शिंदे गटाला 10 अतिरिक्त जागा मिळाल्या असत्या.

Advertisement

(नक्की वाचा - एकटा पडला 'राजा', इंजिन धोक्यात; आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक) )

मनसेमुळे ठाकरे गटाला कसा झाला फायदा?

माहिममध्ये मनसेच्या अमित ठाकरे यांनी 33 हजार 062 मते मिळाली. तर ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत हे 1316 मतांच्या फरकाने विजयी झाले. परळीत आदित्य ठाकरे हे 8801 मतांच्या फरकारने विजयी झाले, तर मनसेच्या संदीप देशपांडे यांना 19367 मते मिळाली. विक्रोलीमध्येही मनसेच्या उमेदवारांना 16813 मते मिळवली तर ठाकरे गटाचे उमेदवार येथून 15526 मतांच्या फरकाने विजयी झाले. 

जोगेश्वरी पूर्वमध्ये मनसेच्या उमेदवाराने 64239 मते मिळवली, तर ठाकरे गटाचा उमेदवार अवघ्या 1541 मतांनी विजयी झाला. दिंडोशीमध्ये मनसेच्या उमेदवाराने 20309 मते मिळवली, तर ठाकरे गटाचा उमेदवार येथे 6182 मतांनी विजयी झाला. 

Advertisement
Topics mentioned in this article