जाहिरात

मनसेच्या उमेदवाराची प्रतिस्पर्ध्यासोबत सिक्रेट मिटींग, मनसेच्याच नेत्याने बाहेर काढला फोटो

MNS Conflict : अखिल चित्र यांनी एकप्रकारे तृप्ती सावंत यांच्या उमेदवारीलाच विरोध केला आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.  

मनसेच्या उमेदवाराची प्रतिस्पर्ध्यासोबत सिक्रेट मिटींग, मनसेच्याच नेत्याने बाहेर काढला फोटो

मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  मात्र तृप्ती सावंत यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध होताना दिसत आहे. तृप्ती सावंत स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीला सामोरे जात आहेत, असा आरोप मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे.  यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अखिल चित्रे यांनी ट्वीट करत करत तृप्ती सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. अखिल चित्रे यांनी लिहिलं की, "ह्याला म्हणतात हिटविकेट. मॅडम, भाई आणि सहकारी निवडणूक चर्चा. कट्टर हिंदू-मुस्लीम कार्यकर्त्यांना फसवण्याचा प्रोग्राम"

अखिल चित्रे यांना याआधीही तृप्ती सावंत यांच्या उमेदवारील विरोध केला होता. अखिल चित्रे यांना याआधीच्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "खरंतर मी कोणत्याही मेसेजवर व्यक्त होणार नव्हतो, परंतु ज्यांना विषय माहीत नाही, विधानसभेची परिस्थिती माहीत नाही, काय घडलं ते माहीत नाही , ते देखील व्यक्त होत आहेत. आणि ते माझेच महाराष्ट्र सैनिक सहकारी आहेत. म्हणून काय घडलं हे त्यांना सांगणे मी माझी जबाबदारी समजतो. म्हणून मी एक खुलासा करत आहे, मला उमेदवारी मिळाली नाही हा विषयचं नाही. पण ज्यांना उमेदवारी दिली गेली आहे त्या मनसेतनं जिंकण्यासाठी नाही तर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उभे राहत आहेत." 

(नक्की वाचा- Dhananjay Munde : पाच वर्षांपूर्वी 3 अपत्ये तर यंदा 5 अपत्ये; धनंजय मुंडेंच्या संपत्तीतही 5 पटींनी वाढ)

"सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी वेळ साधारणता रात्री 9.30 -10.30  दरम्यान ठीकाण मकबा हाईट्स येथे मिटींग झाली. तिथे झिशान सिद्दीकी यांच्याबरोबर सौदा करून फक्त आणि फक्त त्यांच्या सांगण्यावरून निवडणूक मनसेतून लढण्यासाठी ह्या तयार झाल्यात. खार पूर्वचे आमच्या येथील बfचारे हिंदू संघटनेतील कार्यकर्ते समजत आहेत की ह्या मॅडम त्या मुसलमान उमेदवाराला पाडायला उभ्या आहेत. पण त्यांना माहीत नाही त्या तर त्या मुस्लीम आमदाराच्या पैशांवरच त्यांच्या सांगण्यावरून उभ्या आहेत", असं अखिल चित्रे यांनी म्हटलं होतं.  

"आमच्या वांद्रे पूर्व येथील काही भाजप प्रेरित हिंदू संघटना, आम्ही झिशान सिद्दीकीचं काम करणार नाही. हे सांगण्यासाठी ह्या मॅडम बरोबर सागर बंगल्यावर देखील गेल्या होत्या. त्यांना काय माहीत की हा खेळ तर त्यालाच जिंकवण्यासाठी त्या करत आहेत. 28 तारखेला 11  वाजेपर्यंत झिशान भाईंशी चर्चा होईपर्यंत त्यांना मनसे पक्षाची उमेदवारी नको होती. कारण त्याचं आणि त्यांच्या एकच असलेल्या सहकाऱ्यांचं मत होतं कि मनसे पक्षातून जिंकतां येणार नाही' मनसेला वांद्र्यात वोट बॅंक नाही," असं चित्रे यांना ट्वीटमध्ये म्हटलं होते. 

"आणखी खूप काही घडलं 28 तारखेच्या रात्री. माझ्यावर माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांचा विश्वास नसेल तर त्याचा देखील खुलासा करेन योग्य वेळी. राजसाहेबांना फसवले जात आहे, याबाबत नाराजी आहे आणि प्रयत्न करून पण मी माझ्या साहेबांना सांगण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी देखील अपयशी झालो. कारण आज सर्व आसपासची लोकं स्वतःला प्रशांत किशोर सारखे ‘ strategist' समजायला लागले आहेत."  

(नक्की वाचा - मराठा- मुस्लिम -दलित एकत्र, जरांगेंचा पुढचा प्लॅन ठरला! 3 नोव्हेंबरला मोठी घोषणा)

"त्या मॅडम जिंकल्या तरी मनसे पक्षात राहणार नाहीत आणि हरल्या तरी राहणार नाही. कारण तसं ठरवूनच आणि त्यांच्या Bosses काढून पुनर्वसनाचा वादा घेऊनच त्या मनसेत आल्या, “रात्र भर कभी हां कभी ना” करत मग सकाळी शेवटी आल्या. माझ्या राजसाहेबांना फसवले जात आहे, मला माहीती आहे आणि गप्प बसणं ह्याला जर काही कमेंट करणारी लोक राज निष्ठा समजत असतील तर माफी आसावी. मी असा राज निष्ठ नाही", असं अखिल चित्रे यांनी म्हटलं होतं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: