Dombivli News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या एकेरी उल्लेखावरून मनसे नेते राजू पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. डोंबिवलीतील मनसे कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला. 'कोण काय बोलतंय यापेक्षा त्यांची लायकी काय आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना जे पाहिजे ते आपण द्यायला नको. त्यामुळे अशा माणसाविषयी बोलायची आमची अजिबात इच्छा नाही', अशा शब्दांत राजू पाटील यांनी सदावर्ते यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना सल्लावजा इशाराही दिला. फिरताना जरा जपून फिरा. कोणीही येईल आणि तुमच्यावर हल्ला करेल, आणि त्यानंतर तुम्ही आमच्या मनसेचं नाव घ्याल, असे वक्तव्य करत त्यांनी संताप व्यक्त केला.
भाजप प्रदेशाध्यक्षांना टोला...
डोंबिवलीतील आमदारांना आता आगरी समाजाची आठवण आली आहे. आनंदाची बाब आहे. खरं म्हटलं तर त्यांची ही चौथी टर्म आहे तिसऱ्या टर्म मध्ये त्यांनी स्मारक बांधलं होतं. त्यासाठी त्यांच्या अभिनंदन केलं पाहिजे. असाच प्रकारे प्रत्येक समाजाची दखल घेऊन त्यांनी कार्य केलं तर चांगले राहील. डोंबिवलीत शोर्य गाथा कार्यक्रमाला मी पण जाणार होतो मात्र मी बघितले त्या कार्यक्रमात सर्व कमळचे चिन्ह लावून बसले होते म्हणजे एका पक्षाचा कार्यक्रम होता ,त्यामुळे मी जाणे टाळले .मनसे नेते राजू पाटील यांनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना टोला लगावला आहे.
राजकारण तापण्याची शक्यता...
डोंबिवलीतील आन मान ठाकूर शौर्य गाथा या कार्यक्रमावरून राजू पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांना लक्ष केले आहे .शनिवारी डोंबिवलीत रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला होता, या कार्यक्रमात भाजपचे स्थानिक सर्व नेते कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाला मनसे नेते राजू पाटील यांना देखील आमंत्रण होतं, परंतु त्यांनी कार्यक्रमात जाण्याचे टाळले होते यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते .आता मनसे नेते राजू पाटील यांनी यावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा - वर्षभर सोनं खरेदी करू नका, पंतप्रधान असं का म्हणाले? सोनं खरेदी थांबवली तर काय होईल?
रविवारी संध्याकाळी गोग्रासवाडी परिसरात मनसे कार्यालयाचे उद्घाटन होतं. मनसे पदाधिकारी प्रतीक देशपांडे यांच्या या कार्यालयाच्या उद्घाटन राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या भागाचे मनसे पदाधिकारी मनोज घरत महामपालिका निवडणुकीदरम्यान भाजपा प्रवेश केलं होतं. त्याच परिसरात हा मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटन करण्यात आले आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजू पाटील यांनी सांगितले की, लवकरच डोंबिवली शहर अध्यक्षाची देखील घोषणा होईल. मात्र ज्या प्रकारे डोंबिवलीचे आमदार व भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना राजू पाटील यांनी लक्ष केले आहे त्यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे आता यावरून भाजपाची काय प्रतिक्रिया आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world