जाहिरात

Mumbai Monorail: मोनोरेलमध्ये प्रवाशी अडकले, एसी बंद, श्वास गुदमरला, शेवटी काचा फोडून...

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई अग्निशमन दलाची तीन स्नोर्कल वाहने घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.

Mumbai Monorail: मोनोरेलमध्ये प्रवाशी अडकले, एसी बंद, श्वास गुदमरला, शेवटी काचा फोडून...
मुंबई:

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे म्हैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्टेशनदरम्यान एलिवेटेड मोनोरेल अडकली आहे. प्रवाशांना वाचवण्यासाठी क्रेनचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मोनोरेल चेंबूरजवळ थांबली असून, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ती अडकल्याचे म्हटले जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अग्निशमन दलाच्या टीमने चेंबूर आणि भक्ती पार्कदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे थांबलेल्या मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले आहे.

नक्की वाचा - Dombivali Rain: पावसाचा दणका! खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यात कंबरेपर्यंत पाणी

काचा तोडून प्रवाशांना बाहेर काढणार

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू असताना मोनोरेल म्हैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्टेशनदरम्यान थांबली. अग्निशमन दल आणि इतर यंत्रणा क्रेनच्या मदतीने बचावकार्य करत आहेत. एलिवेटेड ट्रॅकवर धावणारी ही ट्रेन किमान एक तासाहून अधिक काळ थांबून होती. मुंबई मोनोरेलने अधिकृत प्रेस रिलीझमध्ये सांगितले आहे की, 'वीजपुरवठ्यात किरकोळ समस्या' आल्यामुळे ट्रेन थांबली.

एसी बंद झाल्याने प्रवासी घुसमटले

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई अग्निशमन दलाची तीन स्नोर्कल वाहने घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. खिडक्यांच्या काचा तोडून प्रवाशांना वाचवले जाईल. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. म्हैसूर कॉलनीजवळ अडकलेल्या मोनोरेलच्या आतील चित्रांवरून हे स्पष्ट होत आहे की, एअर कंडीशनिंग बंद असल्यामुळे प्रवासी खूप त्रस्त झाले आहेत. दरवाजेही बंद असल्यामुळे आतील तापमान वाढले आहे, ज्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश 

दरम्यान याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. कुणी हा घाबरू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल असं ही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर ही मोनोरेल कशी बंद पडली याच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com