MPSC Paper Leak: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) 22 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'औषध निरीक्षक' भरती परीक्षेत पेपर लीक आणि गुणांमध्ये फेरफार झाल्याचा खळबळजनक आरोप उमेदवारांनी केला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हॉट्सअॅप चॅट्स आणि गुणपत्रिकांचे स्क्रीनशॉट्स प्रचंड व्हायरल होत आहेत. 'NDTV मराठी' याबाबत पुष्टी करत नाही. पण याच चॅटमध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहे.
दोन उमेदवारांची 'एमपीएससी' आणि FDA कडे लेखी तक्रार
दोन उमेदवारांनी या प्रकरणाबाबत पुराव्यांसह एमपीएससी आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, 22 मार्च रोजी परीक्षा असताना, 20 मार्चलाच प्रश्नपत्रिकेतील तब्बल 78 प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सअॅपवर प्रसारित करण्यात आली होती.
(नक्की वाचा- Pune News: लग्नासाठी वडिलांनी आधार कार्डमध्ये केला घोटाळा; मुलीच्या एका कॉलने खळबळ)
या माहितीच्या आधारे काही विशिष्ट उमेदवारांना अपेक्षेपेक्षा अत्यंत जास्त गुण मिळाले आहेत. तसेच अधिकृत गुणवत्ता यादी आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गुणपत्रिकांमध्ये तफावत (विसंगती) आढळली आहे. संबंधित संशयित व्यक्तींचे व्हॉट्सअॅप चॅट्स, मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुरावे तपासून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.
(नक्की वाचा- Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'; हवामान विभागाच अंदाज काय?)
"आयोगाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू"
या गंभीर आरोपांनंतर एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी आयोगाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हरपाळकर यांनी म्हटलं की, "औषध निरीक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया महिनाभरापूर्वीच पूर्ण झाली असून त्याचा निकालही अधिकृतपणे जाहीर झाला आहे. या प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झालेला नाही. तरीही जर तक्रारीत काही तथ्य आढळले तर त्याची नक्की चौकशी केली जाईल. परंतु ही माहिती खोटी सिद्ध झाल्यास आयोगाची प्रतिमा मलीन करण्याचा आणि विद्यार्थ्यांमध्ये अविश्वास पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world