जाहिरात

Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींचा त्रास वाढणार? शासनाकडून योजनेबाबत मोठा बदल

लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणीचे काम मर्यादित स्वरुपात येत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे राज्य शासनाच्या निर्णयात म्हटले आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती.

Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींचा त्रास वाढणार? शासनाकडून योजनेबाबत मोठा बदल

संजय तिवारी, नागपूर

लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीचे काम यापुढे आपले सेवा केंद्रातून होणार नाही. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचे काम आंगणवाडी सेविकांद्वारे होणार आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आता लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणीचे काम मर्यादित स्वरुपात येत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे राज्य शासनाच्या निर्णयात म्हटले आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांद्वारे अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, असे निर्णयात म्हटले आहे.

(नक्की वाचा -  Shilpa Shinde : शिल्पा शिंदेच्या आरोपाने हादरलं बॉलिवूड, चित्रपट निर्मात्यावर गंभीर आरोप)

या शासन निर्णयामुळे आपले सेवा केंद्र संचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विश्वासात न घेता आणि थकीत मानधन न देता हा निर्णय राज्य सरकारने घेतला, असा आरोप त्यांनी केला आहे. सेवा केंद्रांना लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचे काम केल्याने झालेले मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. 

(नक्की वाचा - महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी? मंत्रालयातील लगबगीमळे चाहूल लागली)

कुणाचे अर्ज स्वीकारणे किंवा नोंदणी करण्याचे अधिकार आजपासून रद्द?

  • आशा सेविका
  • सेतू सेवा केंद्र
  • आपले सरकार सेवा केंद्र
  • समूह संघटक सीआरपी अंतर्गत शहरी आणि ग्रामीण लाईव्हहूड मिशन
  • मदत कक्ष प्रमुख
  • सिटी मिशन मॅनेजर
  • ग्राम सेवक इत्यादी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
उल्हासनगरात मद्यधुंद रिक्षाचालकाची वाहतूक पोलिसाला मारहाण, घटनेचा VIDEO आला समोर
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींचा त्रास वाढणार? शासनाकडून योजनेबाबत मोठा बदल
best-investment-schemes-for-women-in-india-invest-in-these-government-government-saving-schemes
Next Article
महिलांनो, 'लाडक्या बहिणी'सह 3 सरकारी योजनांचा घ्या फायदा, घरबसल्या करा लाखोंची कमाई