जाहिरात

Mumbai News : "तू गोरी आहे, बारीक आहेस..." नगरसेविकेला रात्री मेसेज करणाऱ्याला न्यायालयाने शिकवला धडा

Mumbai News : न्यायालायने निकालात म्हटले की,  अनोळखी व्यक्तीने रात्रीच्या असे असा अश्लील मेसेज किंवा फोटो पाठवले तर एखाद्या महिलेला आणि तिच्या पतीला अजिबात आवडणार नाही.

Mumbai News : "तू गोरी आहे, बारीक आहेस..." नगरसेविकेला रात्री मेसेज करणाऱ्याला न्यायालयाने शिकवला धडा

माजी नगरसेविकेला रात्री उशीरा व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. जानेवारी 2016 मधील ही घटना आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आरोपीने सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. सत्र न्यायालयानेही आरोपीचा दावा फेटाळत शिक्षा कायम ठेवली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे प्रकरण?

मुंबईतील नगरसेविकेला 2016 आरोपी व्यक्तीने रात्री अश्लील मेसेज केले होते. "तू बारीक आहेस. हुशार दिसतेस. तू गोरी आहेस, मला तू आवडतेस, तू विवाहित आहेस की नाही?" असे मेसेज रात्रीच्या वेळी व्हॉट्सअॅपवर पाठवले होते. नगरसेविकेसाठी ही गोष्ट अपमानित करणारी आणि विनयशीलतेचा भंग करणारी होती. 

(नक्की वाचा-  Chhaava : छावा चित्रपटावर शिर्के कुटुंबीय आक्रमक, दिग्दर्शकाला राज्यात फिरु न देण्याचा इशारा)

महिलेने तातडीने घडलेला प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला होता. त्यावेळी नवऱ्याने त्या नंबरवर फोन केला. मात्र आरोपी नरसिंह गुडे याने फोन उचलला नाही. पुन्हा मेसेज करुन आरोपीने म्हटलं की,  "माफ करा पण मी रात्रीच्या वेळी फोन घेत नाही. मला व्हॉट्सअॅप चॅटिंग करायला आवडते, आपण ऑनलाइन बोलू शकतो." आरोपीने महिलेला अश्लील फोटो देखील पाठवले. महिलेने याबाबत पोलिसात तक्रार केली होती. 

न्यायालायने निकालात म्हटले की,  अनोळखी व्यक्तीने रात्रीच्या असे असा अश्लील मेसेज किंवा फोटो पाठवले तर एखाद्या महिलेला आणि तिच्या पतीला अजिबात आवडणार नाही. त्यामुळे महिलेची आणि तिच्या पतीची साक्ष तसेच पुराव्यांवरून आरोपीने महिलेला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्याचे सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने म्हटलं. सत्र न्यायालाने कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला दिलेली तीन महिन्यांची शिक्षा कायम ठेवली.

(नक्की वाचा- कुणी निवृत्त PSI तर कुणी फाड-फाड इंग्रजी बोलतंय; शिर्डीत 80 भिकाऱ्यांची धरपकड)

महिलेने राजकीय द्वेषाने आपल्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा आरोपीने केला. मात्र महिला खोटे प्रकरण दाखल करुन स्वत:ची बदनामी करुन घेणार नाही. तसेच आरोपीने मेसेज आणि फोटो पाठवले नाही हे सिद्ध करण्यासाठीही न्यायलयाने संधी दिली होती. मात्र आरोपीला स्वत:ला सिद्ध करता आले नाही.  त्यामुळे न्यायालयाने आपली शिक्षा कायम ठेवली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: