जाहिरात

गॅस टंचाईत सायबर गु्न्हेगारांचा सुळसुळाट! 4 दिवसात 26 लाख लुटले; एका चुकीमुळे बँक अकाऊंट होईल रिकामं

Mumbai Mahanagar Gas Cyber Fraud: मुंबईत गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून सायबर भामट्यांनी 4 दिवसांत 26 लाखांहून अधिक रुपये लुटले आहेत.

गॅस टंचाईत सायबर गु्न्हेगारांचा सुळसुळाट! 4 दिवसात 26 लाख लुटले; एका चुकीमुळे बँक अकाऊंट होईल रिकामं

ऋतिक गणकवार, मुंबई

Mumbai Cyber Fraud:  इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात इंधनाचे संकट निर्माण झाले असताना, याचा गैरफायदा आता सायबर भामट्यांनी* घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबईत गॅस कनेक्शन कापले जाण्याची भीती दाखवून गेल्या 4 दिवसांत निष्पाप नागरिकांना तब्बल 26 लाख 43 हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती सर्वसामान्यांमध्ये असल्याने याच भीतीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार आता सक्रिय झाले आहेत. मुंबईतील काही ठिकाणी फसवणुकीच्या मोठ्या घटना समोर आल्या असून, यात तब्बल 26 लाख 43 हजार रुपयांचा गंडा घातला गेला आहे.

(नक्की वाचा-  Deepika Padukone: दीपिकाचा संयम सुटला! मुंबईच्या सद्यस्थितीवर ट्वीट; BMC ला टॅग करत म्हणाली...)

सायबर भामट्यांची 'मोडस ऑपरेंडी' 

हे भामटे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना आपले लक्ष्य करत आहेत. नागरिकांची फसवणूक करण्यासाठी भामटे 'महानगर गॅस लिमिटेड'चे (MGL) अधिकारी असल्याचे भासवून फोन करतात. तुमचे गॅस बिल थकीत आहे किंवा युद्धामुळे पुरवठा कमी असल्याने तुमचे कनेक्शन कापले जाणार आहे, अशी भीती घातली जाते. कनेक्शन सुरू ठेवण्यासाठी केवळ 10 ते 20 रुपये भरण्यास सांगितले जाते. पैसे भरण्यासाठी ते 'mahanagar apk' नावाची एक फाईल पाठवतात. या लिंकवर किंवा फाईलवर क्लिक करताच पीडितांच्या मोबाईलचा ताबा भामट्यांकडे जातो आणि काही क्षणात बँक खाते रिकामे होते.

Mumbai NEws

Mumbai NEws

या भागांत घडल्या घटना

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 4 दिवसांत विलेपार्ले, वडाळा आणि पार्क साईड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व प्रकरणांत एकूण 26 लाख 43 हजार रुपये लुटले गेले असून पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

(नक्की वाचा-  Rename Taj Mahal: 'ताजमहल'चे नाव बदलणार? केंद्र सरकारने संसदेत दिलं उत्तर)

सुरक्षित राहण्यासाठी 'या' टिप्स

  • अनोळखी लिंक टाळा: व्हॉट्सॲप किंवा मेसेजवर आलेल्या कोणत्याही 'APK' फाईलवर चुकूनही क्लिक करू नका.
  • अधिकृत ॲप वापरा: गॅस बिल भरण्यासाठी केवळ अधिकृत वेबसाईट किंवा 'MGL'च्या अधिकृत ॲपचाच वापर करा.
  • पिन शेअर करू नका: कोणतेही सरकारी कार्यालय किंवा गॅस कंपनी तुमचा ओटीपी (OTP) किंवा पिन मागत नाही.
  • शहानिशा करा:  जर असा कॉल आला, तर अधिकृत कस्टमर केअर नंबरवर फोन करून खात्री करा.

"इराण-इस्रायल युद्धाचा आणि गॅस टंचाईचा कोणताही संबंध तुमच्या वैयक्तिक कनेक्शनशी जोडून जर कोणी पैसे मागत असेल, तर ते सायबर गुन्हेगार असू शकतात. अशा वेळी त्वरित 1930 या सायबर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा," असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com