
Mumbai Metro Line-3 Expands: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनदरम्यानच्या (9.77 किमी) सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आला. मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या मार्गावरील अंतिम टप्प्याचा शुभारंभ येत्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
मुंबई मेट्रो लाइन-3 (फेज 2अ - बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) BKC to Acharya Atre Chowk Route सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी स्टेशनहून हिरवा झेंडा दाखवून केला. त्यानंतर त्यांनी बीकेसी ते सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनदरम्यान प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )

Photo Credit: PTI
बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्ग सुरू कधी होणार?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या 13 किलोमीटर मार्गाचे लोकार्पण 7 ऑक्टोबर 2024 रोजी झाले. आता फेज 2अ - बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्ग हा दुसरा टप्पा उद्यापासून (10 मे 2025) नागरिकांसाठी खुला होणार आहे. आतापर्यंत 22 किलोमीटर मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असून मेट्रो तीनचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. येत्या ऑगस्टमध्ये मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याचा मार्गावरील मेट्रो सेवा सुरू होईल. मेट्रो 3 मुंबईतील विमानतळांशी देखील जोडली जाणार आहे.
(नक्की वाचा: India Pakistan Tension: मॉकड्रिल, ब्लॅकआऊट अन् सुट्ट्या ही रद्द, फडणवीसांनी काय दिले आदेश?)

Photo Credit: PTI
मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार (Engineering Feat Under the Mithi River)
मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा मेट्रोचा मार्ग मिठी नदीच्या खालून जात आहे. त्याचप्रमाणे गिरगावसारख्या गर्दीच्या ठिकाणीही मेट्रोचे काम सुरळीत झाले आहे. आता अंतिम टप्प्यातील दोन स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंतच्या मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मार्गावर प्रवाशांना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. या मार्गावरील सर्व मेट्रो स्थानकेही अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असून प्रत्येक स्थानकावर प्रवेशासाठी अनेक प्रवेश मार्ग असल्याने गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल. तसेच मेट्रो मार्ग हे प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Transforming Mumbai's Commute...🚇
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 9, 2025
Mumbai Metro Route 3, Phase 2-A : A new era of Seamless, World-Class Connectivity!
Flagged off 'Phase 2A of Mumbai Metro 3 from BKC to Acharya Atre Chowk (9.77 km)' today at BKC, Mumbai today.
Under Hon PM Narendra Modi Ji's leadership, the… https://t.co/s2jvSPmYVu pic.twitter.com/rZOKHgWc1w
मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोची कामे मोठ्या वेगाने सुरू आहेत. याद्वारे मुंबईकर तसेच महामुंबईतील नागरिकांसाठी सुलभ आणि अखंड परिवहन जोडणी (सिमलेस ट्रान्स्पोर्ट सिस्टीम) यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी 50 किलोमीट तर पुढील वर्षी आणखी 50 किलोमीटर मेट्रोचे (Metro to Deliver Seamless Commute) काम पूर्ण करण्याचा मानस आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
(नक्की वाचा: Best Bus fare : मुंबईकरांचा प्रवास महागला, बेस्ट बसचे भाडे दुप्पट! वाचा किती वाढले दर)
सिंगल प्लॅटफॉर्मवर सर्व सार्वजनिक परिवहन सेवा मिळणार
मेट्रो, बेस्ट (BEST), लोकल (Local) या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी सिंगल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यातून प्रवाशांना एकाच तिकिटावर प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत हा प्रयोग सुरू करण्यात येणार असून त्यानंतर महामुंबईतही ही सेवा देण्यात येणार आहे. सध्या यावर प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू असून लवकरच त्याचा व्यावसायिक वापर सुरू होईल. यामुळे नागरिकांना मुंबई तसेच महामुंबई परिसरात सुलभपणे प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
बेस्टने कालच गुगल सेवेबरोबर सांमजस्य करार केला आहे. यापुढे बेस्टच्या बसेसचे रिअल टाइम लोकेशन गुगलवर मिळणार असून या ठिकाणी प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजनही करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Photo Credit: PTI
मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांना दिलासा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Metro: A Game-Changer for Mumbaikars)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. मेट्रोमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मेट्रोमुळे या मार्गावरील सुमारे चार ते पाच लाख वाहने कमी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन व वेळेची बचत होणार आहे. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबईत उभारण्यात येत आहे. नागरिकांची गरज ओळखून कामे होत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मेट्रोची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील 50 टक्के वाहने कमी होतील. त्यामुळे महामुंबईकरांसाठी मेट्रो प्रकल्प वरदान ठरणार आहे.
टप्पा 2 अ - बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाची माहिती ( Metro Line-3 Phase 2A: Quick Facts)
- स्थानकांची संख्या - 6 (सर्व भूमिगत)
- अंतर – 9.77 किमी
- हेडवे - 6 मि 20 सेकंद
- तिकिटाचे दर - किमान भाडे 10 रुपये, कमाल भाडे 40 रुपये
- गाड्यांची संख्या - आठ
- प्रवास वेळ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक)- 15 मिनिटे 20 सेकंद
- फेऱ्यांची संख्या - 244 फेऱ्या
- प्रवास वेळ आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक- 36 मी
- तिकिट दर आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक किमान भाडे 10 रुपये, कमाल भाडे 60 रुपये/-
- एकूण एस्केलेटरची (सरकते जीने) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) 208
- एकूण लिफ्टची संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) - 67
कनेक्टिविटी (Connectivity And Key Destinations)
बीकेसी, वरळी यांसारख्या बिझनेस हब्सना जोडले जाणार आहे. बीकेसी स्थानक मेट्रो मार्ग 2 बी आणि बुलेट ट्रेनशी भविष्यात जोडले जाणार असून त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. सिद्धिविनायक मंदिर, माहीम दर्गा आणि माहीम चर्च यासारखी धार्मिक स्थळे तसेच शिवाजी पार्क, रवींद्र नाट्य मंदिर, शिवाजी मंदिर, यशवंत नाट्य मंदिर, प्लाझा सिनेमा यासारखी मनोरंजनाची ठिकाणे देखील या मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world