जाहिरात

Mumbai Metro Line 8: दोन्ही विमानतळे मेट्रोने जोडली जाणार; खर्च, डेडलाइनसकट सगळा तपशील पाहा

मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी पुढील 6 महिन्यांत भूसंपादनासह सर्व तांत्रिक मंजुरी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Mumbai Metro Line 8: दोन्ही विमानतळे मेट्रोने जोडली जाणार; खर्च, डेडलाइनसकट सगळा तपशील पाहा
मुंबई:

मुंबईतील प्रवाशांसाठी आणि विशेषतः विमान प्रवास करणाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. मंगळवारी म्हणजेच 27 जानेवारी रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) यांना जोडणाऱ्या 'मेट्रो लाईन 8' च्या कामाला वेग देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

नक्की वाचा: मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार! कुठे-कुठे असतील थांबे?

3 वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी पुढील 6 महिन्यांत भूसंपादनासह सर्व तांत्रिक मंजुरी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच सर्व परवानग्या मिळवणे अनिवार्य करण्यात आले असून, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर पुढील 3 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

'मेट्रो लाईन 8' ची वैशिष्ट्ये काय आहेत?

एकूण लांबी: 35 km.
9.25  किलोमीटरचा टप्पा हा  भूमिगत (Underground) असेल, तर 24.636 km मार्ग उन्नत (Elevated) असेल.

स्थानके: या मार्गावर एकूण 20 स्थानके असतील. त्यापैकी 6 स्थानके भूमिगत आणि 14 स्थानके उन्नत असतील.

कशी असेल स्टेशनची रचना?:  मुंबई विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर पूर्व पर्यंत भूमिगत स्थानके असतील. तर घाटकोपर पश्चिम स्थानक ते नवी मुंबई विमानतळ टर्मिनल 2 स्थानकापर्यंत उन्नत स्थानके असतील.

दोन स्टेशनमधील सरासरी अंतर किती असेल?: दोन स्थानकांमधील अंतर साधारणपणे 1.9 km असेल.

नक्की वाचा: मीरा-भाईंदरमधला डबल डेकर पूल असा का बांधला ? MMRDA ने दिले स्पष्टीकरण

या मेट्रोमार्गासाठी किती खर्च अपेक्षित आहे ?

या महाकाय प्रकल्पासाठी एकूण 22,862 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी 30.7 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून, केवळ भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील वाढती गर्दी, मुंबई तसेच नवी मुंबई या दोन्ही विमातळावर उतरणाऱ्या प्रवाशांची सोय लक्षात घेता हा मेट्रो मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com