Donald Trump Fake Aadhaar Card: बोगस आधार तयार होण्याचे प्रकार दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पण आता चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावरच बोगस आधार कार्ड तयार करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. इतकंच नाही तर ट्रम्प यांचे आधार कार्ड तयार करून बनावट मतदार म्हणूनही नोंदणी करण्यात आलीय. या धक्कादायक प्रकाराबाबत मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केलीय.
रोहित पवारांचा आरोप
दुबार मतदार नोंदणीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी 16 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेतली होती. कशा पद्धतीने एका वेबसाइटवर बनावट आधार कार्ड तयार केले जातात आणि बोगस मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी याचा वापर केला जातो, याची माहिती रोहित पवारांनी उघड केली होती.
वेबसाइटविरोधात तक्रार
दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सोशल मीडिया सेलचे सह-संयोजक धनंजय वागस्कर यांनी एका युट्यूब चॅनेलवर हा मजकूर पाहिला, ज्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यावरही आरोप करण्यात आले होते. यासंदर्भात एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत वागस्कर यांनी वेबसाइटचा अज्ञात निर्माता, मालक, युजर्संसह अन्य काही लोकांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. एफआयआरनुसार तक्रारदाराने दावा केलाय की, कोणत्यातरी नेत्याने केलेला हा फसवणुकीचा प्रकार भारतातील एका स्वायत्त संस्थान आणि त्यांच्या (भाजपा) पक्षाविरोधात जनतेमध्ये राग तसेच द्वेष निर्माण करून सामाजिक सुरक्षा धोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय. वागस्कर यांनी असाही आरोप केलाय की, बनावट वेबसाइटच्या माध्यमातून बोगस आधार कार्ड तयार करून समाजातील दोन समूहांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा आणि वाद लावण्याचा प्रयत्न केला जातोय. तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी मंगळवारी (30 ऑक्टोबर) बोगसगिरी, ओळख चोरणे, खोटी माहिती पसरवणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिलीय.
(नक्की वाचा: Woman Molestation News: आणखी एका पोलिसाचं तत्काळ निलंबन, भररस्त्यात महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप)
मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीच्या बाजूने निकाल लागल्यानंतर, बनावट मतदारांची नोंदणी, खऱ्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात वगळणे आणि दुबार मतदार नोंदणी यासारख्या गोष्टींमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी 16 ऑक्टोबर रोजी केला होता. रोहित पवारांनी असाही दावा केलाय की, "एका मतदारसंघातील मतदाराचे आधार कार्ड दुसऱ्या मतदारसंघातील मतदारांची नोंदणी करण्यासाठी फोटो आणि नाव बदलून वापरले गेले आहेत, अशीही उदाहरणं आहेत."
(Content Source : PTI Bhasha)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
