जाहिरात

Mumbai One App: 11 सार्वजनिक वाहतूक तिकिटे एकाच ॲपवर, मुंबई वन ॲपला पहिल्या दिवशी प्रतिसाद कसा?

पुढच्या टप्प्यात फेरी सर्व्हिस देखील यात समाविष्ट करण्यात येणार असून ओला-उबरसारख्या कॅब सेवांना जोडण्यासाठी चर्चाही सुरू आहे.

Mumbai One App: 11 सार्वजनिक वाहतूक तिकिटे एकाच ॲपवर, मुंबई वन ॲपला पहिल्या दिवशी प्रतिसाद कसा?
मुंबई:

विशाल पाटील 

मुंबईकरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे “मुंबई वन” हे एकत्रित मोबाईल ॲप आजपासून सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी या ॲपला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. या ॲपमुळे प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. तसेच विविध वाहतूक सेवांची तिकिटे एका क्लिकवर मिळणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे. फक्त मुंबईच नाही तर ठाणे ,मिरा भाईंदर , कल्याण डोंबिवली,नवी मुंबई शहरात सुद्धा या ॲपचा फायदा होणार आहे  केंद्र सरकारच्या “वन नेशन, वन कार्ड” या संकल्पनेच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. हे ॲप एमएमआरडीए (MMRDA) ने विकसित केले आहे. आतापर्यंत प्रवासासाठी वेगवेगळी ॲप्स वापरावी लागत होती. मात्र सर्व सेवा एकत्र आणणारे एकही ॲप उपलब्ध नव्हते. ही कमतरता मुंबई वन ॲपने भरून काढली आहे.

या ॲपमध्ये एकूण 11 सार्वजनिक वाहतूक सेवांचा समावेश असून 14 लाईन्सवर तिकीट सुविधा मिळणार आहे.एमएमआरडीए हे ॲपचे अ‍ॅग्रिगेटर म्हणून कार्य करणार आहे. पुढच्या टप्प्यात फेरी सर्व्हिस देखील यात समाविष्ट करण्यात येणार असून ओला-उबरसारख्या कॅब सेवांना जोडण्यासाठी चर्चाही सुरू आहे. पहिल्याच दिवशी या ॲपला मुंबईकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत 27,047 जणांनी ॲपचा वापर केला असून 30 हजारांहून अधिक जणांनी हे ॲप डाउनलोड केले आहे.

नक्की वाचा - मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मेट्रोचा कसा असेल मार्ग? कधी पूर्ण होणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

कोणत्या सेवांचे तिकीट मिळू शकते ?

1. मुंबई मेट्रो (Metro)
    •सर्व मेट्रो लाईनचे QR तिकीट व स्मार्ट कार्ड रिचार्ज

2. मोनोरेल (Monorail)
    •मोनोरेल तिकीट बुकिंग

3. BEST बस
    •बस पास / डिजिटल तिकीट (टप्प्याटप्प्याने सुरु)

4. एमएसआरटीसी बस 
    • लांब पल्ल्याच्या काही सेवा

5. लोकल ट्रेनसाठी एकत्रिकरणाची प्रक्रिया सुरू
    •भविष्यात UTS ॲपशी जोडणाऱ्या सुविधा

6. अॅप-आधारित मिनी बस / शटल सेवा

7. मेट्रो पार्किंग तिकीट / पेमेंट

लवकरच जोडल्या जाणाऱ्या सेवा

  • फेरी / जलवाहतूक सेवा
  • ओला - उबर सारख्या कॅब सेवा
  • ऑटो / टॅक्सी एग्रिगेटर
  • ट्रॅव्हल पास / मासिक पास एकाच प्लॅटफॉर्मवर

Listen to the latest songs, only on JioSaavn.com