
How To Use Mumbai One App: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर विविध प्रकल्पांची सुरूवात करण्यात आली. नवी मुंबई विमानतळ, मेट्रो लाईन 3 चा दुसरा टप्पा आणि वन ॲप या तीन प्रकल्पांचा यात समावेश होता. यातील वन ॲप हे मुंबई महानगर क्षेत्रात राहणाऱ्या सगळ्या नागरिकांसाठी खूप फायद्याचे ॲप आहे. हे ॲप वापरायचे कसे याबद्दल अनेकांना माहिती नाहीये. हे ॲप वापरून तुम्ही प्रवासाचे नियोजन फार सुंदर रितीने करू शकाल आणि सगळ्या वाहतूक सेवांची तिकीटे एकदाच काढू शकाल. ज्यामुळे तुमचा तिकीट काढण्यासाठी वेळही वाचेल आणि त्यामुळे प्रवासाला लागणारा वेळही कमी होईल. हे ॲप कसे वापरायचे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात.
नक्की वाचा: मुंबई वन ॲपला पहिल्या दिवशी कसा लाभला प्रतिसाद ?
मुंबई वन ॲप कसे वापरायचे? (How To Use Mumbai One App: for Metro and Local Train Ticket?)
अँड्रॉईड आणि ॲपलसाठी प्ले स्टोअरमध्ये Mumbai One नावाने ॲप उपलब्ध आहे. हे डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर करावे लागेल. तुमचे नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि त्यानंतर आलेला ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही रजिस्टर व्हायल. ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला Plan Journey असा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणापासून जिथपर्यंत जायचे आहे ती दोन्ही ठिकाणे निवडा.
मुंबई वन ॲपमध्ये दहीसर ते भांडूपपर्यंतच्या प्रवासासाठी विविध पर्याय
मुंबई वन ॲप वापरून तिकीट कसे काढावे हे समजावून सांगण्यासाठी आम्ही मुंबई पश्चिमेच्या एका टोकाला असलेल्या दहीसरजवळच्या आनंद नगर मेट्रो स्टेशनची (Anand Nagar Metro Station Yellow Line 2A ) आणि पूर्वेच्या एका टोकाला असलेल्या भांडूप रेल्वे स्टेशनची निवड केली. दोन्ही पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला दहीसरपासून भांडूपपर्यंत जाण्यासाठी विविध पर्याय दाखवण्यात येतील. यामध्ये Earliest Arrival, Cheapest Route, Less Walk, Less Interchange असे पर्यायही दिसतील.
नक्की वाचा: Mumbai One App ची काय आहेत वैशिष्ट्ये?
मुंबई वन ॲपमध्ये आपल्या पसंतीच्या तिकीटानुसार बदलतील तिकीटाचे दर
मुंबई वन ॲपमध्ये आम्हाला प्रवासाची सुरूवात आनंद नगर मेट्रो स्टेशनपासून करण्यास सांगण्यात आले. अंधेरीला उतरून वर्सोवा-घाटकोपर मेट्रो मार्ग निवडण्यास सांगण्यात आले. घाटकोपरला उतरून लोकल ट्रेन पकडून भांडूप गाठण्यास सांगण्यात आले. या सगळ्या प्रवासासाठीच्या तिकीटाचा दर हा 75 रुपये दाखवण्यात आला आणि प्रवासाचा वेळ हा 1 तास 27 मिनिटे दाखवण्यात आला. लोकल ट्रेनचे तिकीट निवडण्याचाही पर्याय देण्यात आला असून तुम्ही फर्स्ट क्लास आणि एसीचे तिकीटही काढू शकता. आम्ही जो पर्याय निवडला होता तो सेकंड क्लासचा होता. यामुळे एकूण तिकीट आम्हाला 75 रुपये इतके दाखवण्यात आले. एसी ट्रेनचा पर्याय निवडला असता आम्हाला एकूण तिकीट 105 रुपये दाखवण्यात आले आणि फर्स्ट क्लासचा पर्याय निवडला असता आम्हाला 95 रुपये इतके तिकीट दाखवण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world