जाहिरात

Rain News: मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा! समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग असेल प्रती ताशी...

समुद्र खवळलेला आहे. या कालावधीत मच्छिमारांनी सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रात जावू नये, अशी सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून मच्छीमारांना करण्यात आली आहे.

Rain News: मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा! समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग असेल प्रती ताशी...
मुंबई:

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम असून समुद्र खवळलेला आहे.त्यातच समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रती ताशी 50 ते 60 किमी राहणार आहे. तो प्रती ताशी 70 कि.मी.पर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने वाहातील. तर दक्षिण महाराष्ट्राच्या दिशेने ते ताशी 65 कि. मी. वेगाने वारे वाहतील. हवामान विभागाने ही शक्यता वर्तविली आहे. 

त्यामुळे राज्यातील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यातील कोकण किनारपट्टीवर 18 ते 22 ऑगस्टदरम्यान वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीदरम्यान समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रती ताशी 50 ते 60 कि.मी. राहणार   आहे. तो वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. 

नक्की वाचा - Dombivali Rain: पावसाचा दणका! खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यात कंबरेपर्यंत पाणी

समुद्र खवळलेला आहे. या कालावधीत मच्छिमारांनी सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रात जावू नये, अशी सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून मच्छीमारांना करण्यात आली आहे. या कालावधीत वित्त व जीवित हानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील मच्छिमार, मच्छिमार सहकारी संस्था, नौका मालक यांना याबाबत सूचित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

नक्की वाचा - Marathwada Rain: मराठवाड्यात कोसळधार! मृतांची संख्या वाढली, जनावरांसह शेतीचं ही मोठं नुकसान

दरम्यान मुंबईत गेल्या दोन दिवसापासून मुंबई शहरालाही पावसाने झोडपले आहे. समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. अनेक भागात पाणी ही भरले आहे. त्याचा परिणाम वाहतूकीवरही झाल्याचं दिसले. रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय घरातून बाहेर पडू नयेत असे निर्देश ही देण्यात आले आहेत. त्यात मच्छीमारांनाही समुद्रात जावू नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com