जाहिरात

Mumbai Rain: मुंबई आणि उपनगरांत सर्वाधिक पाऊस कुठे झाला ? आकडेवारी पाहून आश्चर्य वाटेल

Mumbai Rain: सोमवारी म्हणजेच 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6:00 ते दुपारी 2:00 या वेळेत मुंबईतील विविध भागांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai Rain: मुंबई आणि उपनगरांत सर्वाधिक पाऊस कुठे झाला ? आकडेवारी पाहून आश्चर्य वाटेल
मुंबई:

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारीही (18 ऑगस्ट 2025) आपला जोर कायम ठेवला. सकाळी 6:00 ते दुपारी 2:00 या वेळेत मुंबईतील विविध भागांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. प्रभागनिहाय (Ward-wise) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, दादर, चेंबूर आणि वर्सोवा परिसरात सर्वाधिक पाऊस झाल्याचे दिसून आले आहे.

नक्की वाचा: 19 ऑगस्ट रोजी शाळा कॉलेजना सुट्टी मिळणार? उद्याही मुसळधार पावसाचा अंदाज

दक्षिण मुंबईत सर्वाधिक पाऊस कुठे झाला ?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, शहरात (City) सर्वाधिक पाऊस दादरमधील एसडब्ल्यूडी वर्कशॉप येथे झाला असून, येथे 173.4 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ वरळी फायर स्टेशन येथे 170.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय  बी नाडकर्णी पार्क म्युनिसिपल स्कूल, वडाळा येथे 165.0 मिमी आणि आदर्श नगर स्कूल, वरळी येथे 161.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पूर्व उपनगरांचही मुसळधार पाऊस

पूर्व उपनगरात (Eastern Suburbs) चेंबूरमधील फायर स्टेशन येथे 177.2 मिमी पावसाची नोंद झाली असून, हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले आहे. नूतन विद्या मंदिर येथे 147.4 मिमी, विक्रोळी पश्चिम येथील बिल्डिंग प्रपोजल ऑफिस येथे 145.8 मिमी आणि चेंबूरमधीलच कलेक्टर कॉलनी येथे 145.6 मिमी पावसाची नोंद झाली.

नक्की वाचा: मुंबई-पुण्याशिवाय कोणकोणत्या भागांना रेड अलर्टचा इशारा ? पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

वर्सोव्यातही पावसाचे तुफान

पश्चिम उपनगरात (Western Suburbs) वर्सोवा डब्ल्यूडब्ल्यूटीएफ आणि लगून्स येथे 149.4 मिमी पाऊस झाला. बांद्रा फायर स्टेशन येथे 145.0 मिमी, वर्सोवा पंपिंग स्टेशन येथे 137.4 मिमी, खार दांडा म्युनिसिपल स्कूल, पाली हिल येथे 131.0 मिमी आणि बीकेसी फायर स्टेशन येथे 127.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले असून, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. नागरिकांना आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com