जाहिरात

Nagpur Blast News : नागपूरच्या कंपनीत स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातल्या राऊळगाव तालुक्यातील एनविरा गावाजवळ स्पेशल ब्लास्ट लिमिटेड या बारूद कारखान्यात हा स्फोट झाला आहे.

Nagpur Blast News : नागपूरच्या  कंपनीत स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू

प्रविण मुधोळकर, नागपूर नागपूरमधील स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या एनविरा गावाजवळील  एशियन फायर वर्क्स या फटाके तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर- जिल्ह्यातल्या कळमेश्वर तालुक्यातील एशियन फायर वर्क्स या फटाके तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. नागपूर - काटोल रोडवरील कोतवालबर्डी तालुक्यात एनविरा येथे  एसबी 225 एकरात स्पेशल क्लास लिमिटेडची ही फटाके निर्मिती करणारी कंपनी आहे. फटाके निर्मिती करणाऱ्या या कंपनीत फटाक्यांच्या कव्हर मध्ये बारुद भरुन त्याचे फटाके तयार करण्याचे  काम सुरू असताना दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला.

या स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत तीन कामगार जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलीस तपास करत असून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नागपूर ग्रामीण पोलीसचे अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली  आहे. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नगरपालिकांतून फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवण्यात आल्या.

ट्रेंडिंग बातमी - DRDO चे माजी संचालक हनीट्रॅप प्रकरण; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती उघड

ॲम्बुलन्स देखील घटनास्थळावर तैनात करण्यात आल्या आहेत. या स्फोटामागचे कारण नेमकं काय यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. या घटनेत मृत्यू झालेले दोघेही मध्यप्रदेश मधील शिवनी येथील रहिवाशी होते. या घटनेतील दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूर शहरातील हॅास्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: