नाशिकच्या देवळाली मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीच्या अधिकृत उमेदवार कोण? त्या पत्रामुळे पुन्हा संभ्रम

Nashik Election 2024 : प्रचार इतका पुढे गेला आहे, याचा काहीही परिणाम होणार नाही. मतदारांचं आता ठरलं आहे, चेहरा नवा, बदल हवा. माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास राजश्री अहिरराव यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

किशोर बेलसरे, नाशिक

नाशिकच्या देवळाली मतदारसंघात महायुतीमध्ये एक नवा ट्विट आला आहे. देवळाली मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेच्या राजश्री अहिरराव तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरोज अहिरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवळालीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोज अहिरे यांना पाठिंब्या दिल्याचं पत्र व्हायरल केलं आहे. त्यामुळे महायुती आणि मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहेत. 

शनिवारी काल सरोज अहिरे यांच्या करता देवळाली येथे अजित पवारांनी सभा घेतली. या सभेमध्ये सरोज अहिरे यांना पाठिंबा दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं पत्र सभेत दाखवलं.  मात्र हे जुने बॅकडेटेड पत्र असून एक षडयंत्र आहे. शिवसेना शिंदे गटाच्या सचिवांचे पत्र आहे. मुख्यमंत्र्यांचे पत्र नाही. विरोधकांना हार दिसायला लागली असल्याने असला प्रचार केला जात आहे. हे पत्र माझ्या विजयाची नांदी आहे, समोरच्याचा पराभव स्पष्ट दिसत आहे, असं राजश्री अहिरराव यांनी म्हटलं. 

shivsena Letter

एवढे दिवस हे पत्र कुठे होते. मात्र त्यांना पराभव दिसत असल्याने त्यांनी हे पत्र बाहेर काढलं. मात्र प्रचार इतका पुढे गेला आहे, याचा काहीही परिणाम होणार नाही. मतदारांचं आता ठरलं आहे, चेहरा नवा, बदल हवा. माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास राजश्री अहिरराव यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री पत्राबाबत खुलासा करतील- सरोज अहिरे

अजित पवारांनी स्वत: येऊन सांगितलं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणार नसाल तर जनतेने तुमच्यावर का विश्वाव ठेवावा. २३ तारखेनंतर याचं निराकरण होईल. पत्र बॅकडेटेड आहे मान्य आहे. मात्र निवडणुकीतून माघार घेण्याची तारीख ४ नोंव्हेबर होती.मात्र राजश्री अहिरराव यांनी त्या दिवशी पळ काढला आणि मुदत संपल्यानंतर मीच अधिकृत उमेदवार असल्याचं घोषित केलं. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी हे पत्र काढण्यात आलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लवकरच याबाबत खुलासा करतील, असं सरोज अहिरे यांनी म्हटलं आहे. 

Advertisement