अजित पवार बारामतीतून आगामी विधानसभा निवडणूक लढणार की नाही? अशी चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. अजित पवारांनी गेल्या दिवसात केलेल्या काही वक्तव्यांमुळे या चर्चा सुरु आहे. मात्र अजित पवार बारामतीतूनच निवडणूक लढतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
बारामतीच्या विकासात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. बारामतीमधून उमेदवारीबाबत वेगळा विचार होण्याचं काहीचं कारण नाही. म्हणजेच अजित पवार हेच बारामतीतून उमेदवार असतील यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब सुनील तटकरे यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
(नक्की वाचा - हरियाणामध्ये काँग्रेस-आपमधील बोलणी फिस्कटली; आपकडून 20 उमेदवारांची यादी जाहीर)
बारामतीतील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी म्हटलं होतं की, बारामतीत न सांगता कामं होत आहेत. पण मनात विचार येतो एवढ सगळं करून पण बारामतीकर वेगळा निर्णय घेतात. जिथं पिकतं तिथं विकत नसतं. बारामतीकरांना मी सोडून दुसरा कुणीतरी आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही 1991 ते 2024 या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या माणसाचं काम बघा.
(नक्की वाचा - "बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे", अजित पवार असं का म्हणाले?)
अमित शाहांसोबत जागावाटपाबाबत चर्चा
भाजप नेते अमित शाह यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत आमची चर्चा झाली. अमित शाह यांनी सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील असं स्पष्ट केलं आहे. जागावाटपाबाबत चर्चा होत असताना कुणाला किती जागा मिळणार याबाबतच्या आकड्यांची चर्चा आज तरी झालेली नाही, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.