
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आप यांच्यातील आघाडीबाबतची बोलणी फिस्कटली आहे. आम आदमी पक्षाने आता हरियाणामध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपने आपल्या 20 उमेदवारांची यादी देखील जारी केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू होती. त्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. आम आदमी पक्षाने निर्णय घेण्यासाठी आजपर्यंतची मुदत दिली होती. मात्र काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. जागावाटपावरून दोघांमधील चर्चा फिस्कटली आहे. हरियाणासाठी काँग्रेसची समाजवादी पक्षाशीही चर्चा सुरू आहे.
(नक्की वाचा - Pune Hit and Run : पुण्यात आणखी एक हिट अँड रन; मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू)
#BREAKING: हरियाणा में कांग्रेस और आम आदमी पार्टी गठबंधन नहीं होगा. आम आदमी पार्टी ने अपने हरियाणा के 20 उम्मीदवारों की पहली सूची जारी की#HaryanaElections2024 pic.twitter.com/u34p1deJ9U
— NDTV India (@ndtvindia) September 9, 2024
चर्चेच्या तीन फेऱ्यांनंतर 'आप'ला पाच जागा देण्यावर काँग्रेस सहमत असल्याचे दिसत होते. मात्र आप अधिक जागांच्या मागणीवर ठाम होती. हरियाणाा आपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील गुप्ता यांनी सकाळीच सांगितले होते की, जर आज ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही आमच्या उमेदवारांची घोषणा करू. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही असंच काहीसं म्हटलं होतं. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर आहे, त्यामुळे जास्त वेळ थांबता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.
(नक्की वाचा - Amit Shah : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग; अमित शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर खलबतं)
हरियाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत युती करण्याची कल्पना राहुल गांधी यांची होती. यासाठी पक्षाने केसी वेणुगोपाल, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा, प्रदेश प्रभारी दीपक बाबरिया आणि प्रदेशाध्यक्ष चौधरी उदयभान यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती 'आप'सोबतच्या युतीला अंतिम स्वरूप देत आहे. रविवारी दीपक बाबरिया आणि आपचे नेते राघव चढ्ढा यांच्यातही बैठक झाली.'आप'ने काँग्रेसकडे 10 जागांची मागणी केली होती, मात्र पाच जागांवर निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. मात्र चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्याने ही बोलणी फिस्कटली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world