विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघावर अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे. वरळीतून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आदित्य ठाकरेंसाठी सहज आणि सोपा असा हा मतदारसंघा मानला जातो. मात्र अशा कठीण मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी घेतला आहे. वरळी मतदारसंघ का निवडला? याबाबत स्वत: संदीप देशपांडे यांनी सविस्तरपणे सांगितलं. NDTV मराठीच्या 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या विशेष कार्यक्रम ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभेच्या 2019 सालच्या निवडणुकीत आम्ही हा मतदारसंघ लढवला नव्हता. त्यावेळी इथे आम्ही बाय दिला होता. राज ठाकरे यांनी बाय देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गेल्या पाच वर्षात वरळीचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. वरळीचे प्रश्न मार्गी लागायला हवे होते ते लागले नाहीत. वरळीकरांना दिलासा मिळायला हवा होता, तसं काहीच इथे झालं नाही, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र)
वरळी मतदारसंघंच निवडणूक लढवण्यासाठी का निवडला याबाबत बोलताना संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, माहीममधून निवडणूक लढवण्यासाठी आमच्याकडे बरेच जण आहे. मात्र वरळीकरांसाठी काहीतरी केलं पाहिजे, असं मला सातत्याने वाटत होतं. मी राहतो त्या परिसराला लागूनच हा मतदारसंघ आहे. शिवाय आमच्यामध्ये कुठेही सी लिंक (आदित्य ठाकरेंना टोला) वैगेर नाही. म्हणून राज ठाकरे यांना मी या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी परवानगी दिल्यानंतर मी वरळीत काम सुरु केले.
(नक्की वाचा- युगेंद्र पवारांसमोर उमेदवार देणे टाळता आलं असतं का? रुपाली चाकणकरांनी म्हटलं...)
काही लोकांना असं वाटत आहे की आम्ही इथे आहोत मग कुणी इथे आलं नाही पाहिजे. मला वाटतं हा गैरसमज दूर करणे गरजेचं होतं. काहींचा असलेला हा गैरसमज वरळीकर यावेळी दूर करतील. कुठलाही मतदारसंघ कुणाचीही जहागिरी नसते हे सर्वांना कळलं पाहिजे. राहुल गांधी यांना अमेठीमध्ये कळालं ते इथे असणाऱ्या लोकांनाही कळलं पाहिजे, असा टोला संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world