
एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमातील 'लेट्स स्टार्टअप महाराष्ट्र' या सदरात चितळे उद्योगसमूहाचे इंद्रनील चितळे, सह्याद्री फर्मचे विलास शिंदे आणि एमएससी बँकेचे चेअरमन विद्याधर अनासकर उपस्थित होते. महाराष्ट्रातील स्टार्टअप्समधील संधी आणि त्यांच्यासमोरील आव्हाने यावर तिन्ही मान्यवरांना सखोळ विश्लेषण केलं.
चितळे समुहाने देशातच नव्हे तर जगभरात आपल्या व्यवसायाने ठसा उमटवला आहे. हे यश त्यांना कसं मिळवलं याबाबत बोलताना इंद्रनील चितळे यांनी सांगितलं की, "फूड इंडस्ट्री म्हणून लोकांशी इमोशनल कनेक्ट जपायचा असतो. चितळे समूहाने तोच इमोशनल कनेक्ट जपत जपत ग्राहकांचा प्रतिसाद मिळवला. यातून वेगवेगळ्या देशांमध्ये व्यवसाय करायला संधी मिळाली. मेड इन महाराष्ट्र प्रोडक्ट बाहेर जातो, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे."
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा ))
भारताला जगाचं किचन बनायची क्षमता- इंद्रनील चितळे
जगाच्या व्यासपीठावर मराराष्ट्राला असलेल्या संधीबाबत चितळेंनी म्हटलं की, "महाराष्ट्रात समुद्र आहे, पठार आहे, चांगला मान्सून आहे. त्यामुळे शेतीचं उत्पादन वाढवलं आणि तिकडे मूल्यवर्धन केलं तर ग्लोबल ट्रेड वॉरमध्ये भारताला जगाचं किचन बनायची क्षमता आणि संधी आहे. विकसित राज्य म्हणून आपली देशभरात ओळख आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कसं निर्माण करायचं याची जाण आपल्याला आहे. इतर राज्यांमध्ये हे अजून कमी आहे, याचा फायदा करून अनेक संधी आपण निर्माण करु शकतो."
स्टार्टअप्ससाठी बँकांनी धोरण बदलायला हवं- विद्याधर अनासकर
स्टार्टअप्स यशस्वी होण्यासाठी बँकांची धोरणे देखील तितकीत महत्त्वाची आहेत. याबाबत बोलताना एमएससी बँकेचे चेअरमन विद्याधर अनासकर यांनी सांगितलं की, बँकर्सनी सिक्युरिटी ओरिएंटेड बँकींग सोडून दिली पाहिजे. स्टार्टअप्स सुरु करताना बँका लोन देताना सिक्युरिटी काय आहे याची विचारणा आधी करतात. अनेक वेळा सिक्युरिटी नसल्याने लोन मिळत नाही. स्टार्टअप्सना फायनान्स करताना सिक्युरिटीपेक्षा नेमका प्रोजेक्ट काय आहे हे तपासलं पाहिजे.
( नक्की वाचा : NDTV Marathi Manch Conclave : 'महाराष्ट्र थांबणार नाही, वेगाने पुढं जाणार'; NDTV मराठीच्या मंचावर नव्या मंत्र्यांनी सांगितलं पुढील 5 वर्षांचं व्हिजन )
बँकांनी स्टार्टअप्सना गरज असेल तेवढे पैसे दिले पाहिजेत. स्टार्टअप्सना उत्पन्न कमावायला बँकांनी भाग पाडलं पाहिजे. त्या उत्पन्नातून रिकव्हरी हा फोकस बँकांचा असला पाहिजे. मालमत्तांमधून रिकव्हरी हा बँकाचा फोकस नसायला हवा. बँकानी हा बदल आपल्या धोरणात केला, तर स्टार्टअप निश्चितच मदत होईल. शासनाकडून मिळणारे अनुदान पाहून स्टार्टअप्सने यात जाऊ नये. तो एक बोनस समजावा. मात्र तोच फोकस ठेवून जाल तर तुमचं व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. मात्र बँकांनी आपली धोरणे बदलली तर महाराष्ट्र 100 टक्के स्टार्टअप्समध्ये नंबर वनला जाईल, अशी खात्री विद्याधार अनासकर यांनी व्यक्त केली.
सरकारने हे सुनिश्चित केले पाहिजे की योजनांचे फायदे योग्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि स्टार्टअप कंपन्यांनी स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे, असंही अनासकर यांनी म्हटलं.
सह्याद्री फार्मच्या यशाचं गणित
स्टार्टअप्सबाबत बोलताना सह्याद्री फर्मचे विलास शिंदे यांनी आपला अनुभव सांगताना म्हटलं की, एखादी कंपनी जेव्हा सुरु होते तेव्हा ती नवी आयडिया असते किंवा नवा विचार असतो. स्टार्टअप कल्चरल आणि फार्म प्रोड्युसर कंपनी कल्चर एकाच वेळी समोर आले. सह्याद्री फर्मबाबत आधीपासून स्पष्टता होती. शेतकऱ्यांचे जेवढे प्रश्न आहेत ते एकत्र येऊन सोडवायचे आहेत, अशी या मागची संकल्पना होती. त्यासाठी लागणारं भांडवल, मनुष्यबळ, तंत्रज्ञान असेल याची जुळवाजुळव करायची ही स्पष्टता होती. छोटा शेतकरी म्हणून मला सन्मानाने जगता येईल येवढं उत्पन्न मिळेल, ज्याला मागणी आहे अशीच पिकं निवडली पाहिजेत. मराठवाड्यात फळ पिकांची, विशेषतः लिंबूवर्गीय फळांची वाढ होण्याची क्षमता आहे. एकदा पिकं पुढे नेताना त्याला धोरण हवं.
नक्की वाचा - NDTV Marathi Manch Conclave : एकनाथ शिंदे नाराज असले की दरेगावला जातात? शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले?
सह्याद्री फर्मने द्राक्ष पिकाची निवड केली आणि यातून सह्याद्रीची सुरुवात झाली. पहिल्या पाच वर्षात सर्वात जास्त द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून आम्ही ओळख मिळवली. त्यानंतरचा टप्पा दूधाचा आहे. दूध हे एकच उत्पादन दीडशे पद्धतीने ते ग्राहकांपर्यंत नेता येते. चितळे बंधू यांचं मोठं उदाहरण आहे. सह्याद्री फर्मने फळपिकांच्या मार्गाने आपली जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. सह्याद्री ४२ देशांमध्ये द्राक्षांची निर्यात करते, अशी माहिती विलास शिंदे यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world