जाहिरात
This Article is From Jun 13, 2025

ST News: एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू, आता 'या' गोष्टी बंधनकारक

तसेच या हॉटेल थांब्याची शिफारस करताना त्या क्षेत्रातील आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी करणे अपेक्षित आहे.

ST News: एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू, आता 'या' गोष्टी बंधनकारक
मुंबई:

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर दौऱ्यावर असताना अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट दिली होती. तेथे असलेल्या प्रवाशांच्या सोयी -सुविधा बाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या एसटी महामंडळाने त्वरित एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील अशा हॉटेल-मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यापुढे नवीन हॉटेल थांब्याला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे मान्यता देण्यात येईल. शिवाय ही मान्यता 3 वर्षासाठी दिली जाईल. परंतु 1 वर्षानंतर संबंधित हॉटेल थांब्यावरील सेवा- सुविधाचा फेर आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढील 2 वर्षीच्या मुदत वाढी बाबत विचार केला जाणार आहे. तसेच या हॉटेल थांब्याची निवड करताना तेथील स्वच्छता, अन्नपदार्थ दर्जा आणि बसेसची पार्किंग व्यवस्था यांचा प्राधान्याने विचार केला जावा, असे देखील निविदा प्रक्रियेत नमूद केले जाणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Beed News: 13 वर्षांची मुलगी, 30 वर्षांचा नवरा, एकाच मांडवात दोघांशी लग्न, पुढे जे घडलं ते...

तसेच या हॉटेल थांब्याची  शिफारस करताना त्या क्षेत्रातील आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वस्तुस्थितीजन्य अहवालाच्या आधारे संबंधित हॉटेल थांब्याला मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे  भविष्यात या हॉटेल थांब्या संदर्भात कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर  जबाबदारी निश्चित करुन कडक  कारवाई करण्यात येणारा आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Jalgaon News: अंगावर काटा आणणारी घटना! वडीलांना शॉक लागला म्हणून लेक वाचवायला गेली, पण तिही...

तसेच  संबंधित हॉटेलने महामंडळाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर एफ.आय.आर. देखील दाखल केला जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच मार्ग तपासणी पथकाच्या माध्यमातून वेळोवेळी या हॉटेल थांब्याची तपासणी करण्याच्या सूचना देखील मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत. एकंदर प्रवाशांना योग्य प्रकारे  सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी या हॉटेल थांब्याची  निवड करावी, तसेच त्यातून एसटी महामंडळाचा महसूल देखील वाढवा अशा दुहेरी उद्देशाने नवे हॉटेल- मोटेल धोरण एसटी महामंडळाने जारी केले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com