PM Modi In Mumbai Live: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटनामुळे नवी मुंबईकरांचे आणि मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिकांचे हक्काचे विमानतळ आजपासून सेवेत येण्यास सज्ज होईल. हे विमानतळ आज उद्घाटनानंतर लगेचच पूर्ण क्षमतेने सेवेत येणार नसून, डिसेंबर महिन्यापासून हे विमानतळ पूर्ण क्षमतेनं सेवेत येईल, अशी माहिती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत.
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी मुंबई मेट्रो 3 चा आचार्य अत्रे मार्ग ते कफ परेडदरम्यान अखेरचा टप्प्यातल्या मेट्रो सेवेलाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामुळे आरे कॉलनी, बीकेसी, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालय, विधानभवन मेट्रो मार्गिकेने जोडले जाणार आहेत. बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो-3ची पहिली पूर्णपणे भूमिगत 'अॅक्वा लाईन' आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास सज्ज झाली आहे. या महत्त्वाच्या टप्प्यामुळे आता कफ परेड ते आरेपर्यंत अखंड कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
Live update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरूवात
Live update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. भाषणाच्या सुरूवातील फडणवीस यांनी दी. बा. पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन केले.
Live Update: मुंबईत आता हवाई वाहतूकीची क्षमता वाढणार - नायडू
Live Update: मुंबईत आता हवाई वाहतूकीची क्षमता वाढणार असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले. अंतरराष्ट्रीय हब नवी मुंबई विमानतळ होईल असा आम्हाला विश्वास आहे. आर्थिक व्यवस्था या विमानतळामुळे सुधारेल असं विश्वास नायडू म्हणाले. दोन लाख रोजगार निर्माण होतील. या विमानतळाचे भूमीपूजन आणि उद्घाटन मोदींनीच केले असे ही ते म्हणाले.
Live Update: केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांचे भाषण सुरू
Live Update: केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांचे भाषण सुरू झाले आहे. हवाई वाहतूकीचा जलद गतीने विकास होत आहे. जास्तीत जास्त विमानतळ देशात बांधली जात आहेत. एकाच शहरात दोन विमानतळ या सरकारने बांधून दाखवली आहेत.
Live Update: अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरूवात
Live Update: अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वगुरू म्हणून केला उल्लेख. मोदी मुंबईत येतात तेव्हा ते कुठलं ना कुठलं उद्घाटन ते करत असतात. त्यांच्यात हस्ते आता नवी मुंबईच्या एअरपोर्टचं उद्घाटन होत आहे. मोदींचा हात ज्या ज्या ठिकाणी लागतं त्याचं सोनं होतं.
Live Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाला सुरूवात
Live Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. मुंबईच्या विकासाला पंख देणारा चार प्रकल्पाचे आज उद्घाटन होत आहे हे आमचे नशिब आहे असं यावेळी अजित पवार म्हणाले.
Live Update: नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांचे भाषण
Live Update: नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. त्यानंतर केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांचे भाषण सुरू झाले आहे.
Live Update: पंतप्रधान मोदी कार्यक्रम स्थळी पोहोचले, कार्यक्रमाला सुरूवात
Live Update: पंतप्रधान मोदी कार्यक्रम स्थळी पोहोचले आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे.
Live Update: मोदींचा ताफा कार्यक्रम स्थळी रवाना
Live Update: मोदींचा ताफा कार्यक्रम स्थळी रवाना झाला आहे. त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार ही त्यांच्या सोबत आहे.
Live Update: मोदींच्या हस्ते लवकरच विमानतळाचे उद्घाटन होणार
Live Update: मोदींच्या हस्ते लवकरच विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. लोकार्पण सोहळा काही काही वेळात सुरू होईल. मोदींचा ताफा कार्यक्रमस्थळी निघाला आहे.
Live Update: पंतप्रधान मोदींचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत
Live Update: पंतप्रधान मोदींचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं आहे. सध्या मोदी संपूर्ण विमानतळाची पाहणी करत आहे.
LIVE Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळावर दाखल
LIVE Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळावर दाखल
मराठमोळ्या पद्धतीनं PM Modi यांचं नवी मुंबईत स्वागत होणार
मराठमोळ्या पद्धतीनं PM Modi यांचं नवी मुंबईत स्वागत होणार
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाआधी PM मोदींचं ट्वीट
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाआधी PM मोदींचं ट्वीट
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नवी मुंबईला जात आहे. यासह, मुंबई महानगर प्रदेशाला दुसरे मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळेल, ज्यामुळे व्यापार आणि कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल. मुंबई मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचेही उद्घाटन होईल. मुंबईच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणि या गतिमान शहरातील लोकांसाठी 'सुलभता' वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
On the way to Navi Mumbai to take part in the programme marking the inauguration of Phase-1 of the Navi Mumbai International Airport. With this, the Mumbai Metropolitan Region will get its second major international airport, thus boosting commerce and connectivity. The final… pic.twitter.com/t6v82O6Een
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2025
Navi Mumba Airport: नवी मुंबई विमानतळावर काय कार्यक्रम असणार?
नवी मुंबई विमानतळावर काय कार्यक्रम असणार?
विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या लोककलेचा भव्य जागर अनुभवता येणार आहे. सिडको आणि अदानी समूहाने खास करून महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोककला सादरीकरणाचे आयोजन केले आहे.
कोल्हापूरची लावणी, नाशिकचा दहीहंडी नृत्याविष्कार, विदर्भातील गोंधळी, कोकणातील झेलक्यांचा ठेका तसेच आदिवासी आणि आगरी-कोळी नृत्यांच्या तालावर संपूर्ण परिसर रंगून जाणार आहे. या लोककलांचे कार्यक्रम लोकार्पण सोहळ्याआधी सादर होतील.
हे विमानतळ नवी मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे, यात शंका नाही!
PM मोदी यांनी भाषणातून नवी मुंबई विमानतळाच्या नावाची घोषणा करावी- रोहित पवार
नवी मुंबई विमानतळला अजूनही दि बा पाटील यांचं नाव न दिल्याने, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून ती घोषणा करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
नवी मुंबईच्या विमानतळाला स्व.दी बा पाटील साहेबांचे नाव देण्याची स्थानिक भूमिपुत्रांची आग्रही आणि तेवढीच भावनिक मागणी आहे, परंतु दुर्दैवाने या सरकारला अद्यापही स्थानिकांच्या भावना समजलेल्या दिसत नाहीत.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 8, 2025
आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी तरी आजच्या भाषणात स्थानिक भूमिपुत्रांच्या… pic.twitter.com/PSsDckEcjC
PM Modi in Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिवसभरातील कार्यक्रम कसा असेल?
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची सुरुवात दिल्लीतून होणार आहे. दुपारी १२.३५ वाजता ते दिल्लीहून रवाना होतील आणि दुपारी २.४५ वाजता त्यांचे विमान नवी मुंबई विमानतळावर उतरेल.
कसा असेल कार्यक्रम?
- दुपारी २.४५- नवी मुंबई विमानतळावर लँडिंग
- दुपारी २.५५ - विमानतळ टर्मिनलवर आगमन
- दुपारी ३.०० ते ३.२० - टर्मिनल आणि विमानतळाची पाहणी
- दुपारी ३.३० ते ४.३० - नवी मुंबई विमानतळ, मेट्रो-३ आणि मुंबई वन अॅपचं महा-उद्धाटन
- संध्याकाळी ४.४० - राजभवनाकडे प्रयाण
- संध्याकाळी ५.५० - राजभवनात मुक्काम
PM Modi in Mumbai : पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बहिष्कार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे.या उद्घाटन सोहळ्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने बहिष्कार घातला असून जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव लागत नाही, तोपर्यंत स्थानिक भूमिपुत्र उद्घाटन सोहळे व आनंदोत्सव साजरे करणार नाही, अशी भूमिका स्थानिक भूमीपुत्रांनी घेतली. आजच्या उदघाटन सोहळ्याला आपण उपस्थित राहणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.