पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मंगळवारी वाराणसी मतदारसंघातून भाजपा उमेदवार म्हणून अर्ज भरला. पंतप्रधानांनी यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीची पूर्ण माहिती दिली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान मोदींकडं सध्या 3 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे.
ना स्वत:चं घर ना कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं स्वत:च्या मालकीचं कोणतंही घर तसंच वाहन नाही. पंतप्रधानांनकडं एकूण 52,920 रुपये कॅश आहे. स्टेट बँकेच्या गांधीनगर शाखेत 73,304 तर एसबीआयच्या वाराणसी शाखेत फक्त 7000 रुपये त्यांच्या नावावर जमा आहेत. पंतप्रधान मोदींच्या नावावर एकूण 2 कोटी 85 लाख, 60 हजार 338 रुपयांचे फिक्स डिपॉझिट स्टेट बँकेत आहेत.
( नक्की वाचा : PM मोदींसोबत अर्ज भरताना उपस्थित असलेले गणेश्वर शास्त्री कोण आहेत? )
गेल्या 5 वर्षांमधली संपत्ती
पंतप्रधानांनी गेल्या पाच वर्षाातील त्यांच्या संपत्तीची माहिती देखील यावेळी सादर केली. 2018-19 मध्ये त्यांची संपत्ती 1 कोटी 11 लाख 14 हजार 230 रुपये होती. 2019-20 मध्ये 1 कोटी 72 लाख 7 हजार 60 रुपये, 2020-21 मध्ये 1 कोटी 70 लाख 7 हजार 930 रुपये संपत्ती त्यांच्याकडं होती. 2021-22 मध्ये 1,54,1,870, 2022-23 मध्ये 2,35, 6,080 रुपये त्यांची संपत्ती होती.
सोन्याच्या चार अंगठ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्या त्यांनी अनेक वर्षांपासून जपून ठेवल्या आहेत. अर्थात मोदी या अंगठ्या कधी घालत नाहीत.
मोदींची शैक्षणिक पात्रता
पंतप्रधान मोदी यांनी 1967 साली गुजरात बोर्डातून एसएससी केले. 1978 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली. तर 1983 साली गुजरात विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world