
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली. जवळपास सव्वातास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी त्यांच्या बरोबर खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. शिवाय विधानसभा निवडणुकी वेळी निर्माण झालेली कटूता दूर करण्यासाठी ही शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे. तर ही अनौपचारीक भेट असल्याचे मनसे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीने 'मन'भेद सरले की दबावाचं 'राज'कारण आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र या भेटीचा अर्थ काय आहे हे समजून घेऊया.
( नक्की वाचा : कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं? )
राज आणि शिंदे यांच्या भेटीचं कारण काय?
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा टायमिंग महत्त्वाचं आहे. येत्या काही महिन्यात मुंबईसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुंबई पालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबईत ताकद जास्त आहे, हे विधानसभा निवडणुकीत दिसून आलं आहे.
(नक्की वाचा- Cabinet Meeting: यापुढे कोठडीत मृत्यू झाल्यास... राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय!)
मुंबईत ठाकरे गटाची कामगिरी दमदार राहिली आहे. ठाकरे गटाचे 20 पैकी 10 आमदार मुंबईतील आहे. यावरुन ठाकरे गटाची मुंबईतील ताकद दिसून येते. अशावेळी महायुतीत आणखी काही बेरजेचं राजकारण करता येतं का याची चाचपणी सुरु झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा सामना करायचा असेल तर दुसरे ठाकरे सोबत असल्याचा फायदा होऊ शकतो. तसेच शिंदेंसोबत हातमिळवणी केल्यास मनसेला देखील सत्तेत येण्याची संधी मिळू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world