जाहिरात

विशाळगड अतिक्रमण प्रकरणात प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप, संभाजी भिंडेंना घेरलं!

विशाळगडावर दगडफेक देखील करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. अशात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

विशाळगड अतिक्रमण प्रकरणात प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप, संभाजी भिंडेंना घेरलं!
कोल्हापूर:

गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात विशाळगडाच्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दरम्यान विशाळगडावर दगडफेक देखील करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. अशात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी थेट संभाजी भिडेंवर (Sambhaji Bhide) गंभीर आरोप केले आहे. संभाजी भिडेंच्या धारकांनी विशालगडावर धुडगूस घातला असल्याचं आंबेडकर म्हणाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, विशाळगडावर आधीपासून लोकांनी अतिक्रमण केलं आहे. पण अतिक्रमण काढण्याचे काही नियम आहेत. तुम्हाला ते लगेच हटवता येत नाही, तसा प्रस्ताव दिल्यास ते शक्य आहे. संभाजीराजे आंदोलन करताना जो प्रकार घडला त्यामध्ये संभाजी भिडे यांचं सैन् असल्याची आमच्याकडे माहिती आहे. त्या धारकांनी तिथे धुडगूस घातला. जाणून-बुजून तेथील लोकांना मारहाण करण्यात आली आणि दुकानं तोडण्यात आली. तिथे तंग वातावरण तयार करण्यात आलं. सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा आणि दुसऱ्या बाजूला यावर तोडगा निघू शकतो का? याबाबत मार्ग शोधावा अशी शासनाला आमची विनंती असल्याचे आंबेडकर म्हणाले.

नक्की वाचा - संभाजी राजे फक्त एकाच धर्माच्या अतिक्रमणाच्या विरोधात आहेत? पोलीस स्टेशन बाहेर उभे राहून दिले आरोपांना उत्तर

तिसरी आघाडीची चर्चा म्हणजेच राजकारणातील डावपेच
राज्यात तिसरी आघाडीची चर्चा सुरू असून यावर बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, यात काही सत्य असेल असे मी मानत नाही. राजकारणात अनेक डावपेच असतात, त्यातील हा डावपेच आहे असे आम्ही मानतो. भविष्यात असा काही प्रस्ताव आल्यावर बघू, मी कधीही जर तरच्या भाषेवर बोलत नाही असे आंबेडकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच पत्र आलंच नाही...
आरक्षणाच्या मुद्यावर बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी सर्व पक्षांना पत्र पाठवण्यात येणार होते. अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांच पत्र आलेलं नाही, ते कधी पाठवणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं.

'त्या' आमदारांवर काँग्रेस कारवाई करणार का?
विधान परिषद निवडणुकीत मत फुटली याच खापर काँग्रेस वर फोडलं जात आहे. ज्या आमदारांनी काँग्रेसच्या विरोधात मतदान केलं त्यांच्यावर काय कारवाई होणार हे काँग्रेसने सांगावं असेही आंबेडकर म्हणाले. मनोज जरांगेविषयी बोलताना ते म्हणाले, निवडणूक लढवणार असं जरांगे म्हणत आहेत. त्यामुळे उपोषण करण्यापपेक्षा त्यांनी 288 जागा लढवाव्यात ही आमची अपेक्षा आहे. लोकसभेत गरीब मराठा समाजाने श्रीमंत खासदारांना मतदान केलं. त्यामुळे हे खासदार निवडून आले. त्यामुळे मनोज जरांगे यांनी गरीब उमेदवार उभे केल्यास त्यांना न्याय मिळेल.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com