- राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट महापालिका निवडणुकीत एकत्र आले आहेत
- प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळे लवकरच केंद्रीय मंत्री होऊ शकतात असे वक्तव्य केले
- शरद पवार अजित पवारांच्या साथीने एनडीएमध्ये जाणार
सूरज कसबे
राजकारणात कधी काही अशक्य नसतं. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु आणि कायमचा मित्र ही नसतो. राज्यात शिवसेनेची दोन शकलं झाली. त्यानंतर राष्ट्रवादीत ही दोन गट पडले. शिवसेनेतल्या दोन्ही गटात विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र थोडी वेगळी स्थिती आहे. दोन्ही गटातील नेते हे एकमेकांच्या संपर्कात ही आहेत शिवाय त्यांचे संबंध ही चांगले आहेत. त्यात आता महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर एका बड्या नेत्याने मोठं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. सुप्रिया सुळे या केंद्रात लवकरच मंत्री होती असा दावाच त्यांनी केला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र आले आहे. म्हणजे त्यांचं विलीनीकरण झालं आहे. अजित पवारांच्या साथीने शरद पवारांनी भाजप सोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं. असं भाकीत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबडेकरांनी केलं आहे. त्यामुळं लवकरचं सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये, असं आंबेडकर म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवाय राजकीय वर्तूळात याचे वेगवेगळे अर्थ ही लावले जात आहेत.
काँग्रेसने आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे असं ही ते म्हणाले. ठाकरे शिवसेनेच्या पोटात राज ठाकरे आहेत. त्यामुळं राज ठाकरे ज्या-ज्या पक्षांसोबत युती करणार असेल त्या पक्षांसोबत काँग्रेसने जाऊ नये. काँग्रेसने हे पाळलं नाही तर महाराष्ट्राप्रमाणे देशभरात त्यांचं अस्तित्व कमी होईल, असा इशारा ही आंबेडकरांनी थेट काँग्रेसला दिला. मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आघाडी केली आहे असं आंबेडकर म्हणाले. इतर महापालिकांमध्ये ही भाजप वगळता इतर पक्षांशी आघाडी करण्याचं काम सुरू आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. वंचितने मुंबई महापालिकेत काँग्रेस बरोबर आघाडी केली आहे. या आघाडीला मोठं यश मिळेल अशी अपेक्षा आंबेडकरांना आहे. त्यात त्यांनी राष्ट्रावादी बाबतची भाकीत ही व्यक्त केले आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांवर त्याचा निश्चित परिणाम होवू शकतो. शरद पवारांच्या मनात नेमकं काय सुरू असतं हे कधीच कुणी ओळखलं नाही. त्यात आंबेडकरांनी केलेल्या या विधानाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world