जाहिरात

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सवाला भरघोस प्रतिसाद, 9 दिवसांत 4 विश्वविक्रमांची नोंद

Pune News : पुण्यात पुस्तक विक्रीचा विक्रम झाला असून 9 दिवसात 25 लाख पुस्तकांची विक्री झाली आहे. तर यातून तब्बल 40 कोटींहून अधिकची उलाढाल झाल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सवाला भरघोस प्रतिसाद, 9 दिवसांत 4 विश्वविक्रमांची नोंद

राहुल कुलकर्णी, पुणे

पुण्यात मागील दहा दिवसांपासून सुरु असलेल्या पुस्तक महोत्सवाचा समारोप झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते. या पुस्तक महोत्सवात 4 विश्वविक्रमांची नोंद झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुण्यात पुस्तक विक्रीचा विक्रम झाला असून 9 दिवसात 25 लाख पुस्तकांची विक्री झाली आहे. तर यातून तब्बल 40 कोटींहून अधिकची उलाढाल झाल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. वाचनसंस्कृती वृद्धींगत करण्यासाठी आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाने दुसऱ्या वर्षी नवा इतिहास घडवला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Sushila Meena: जहीरसारखी अ‍ॅक्शन, सचिनकडून कौतुक; पण त्या मजुराच्या लेकीचं भवितव्य काय?

पुणे पुस्तक महोत्सवाला 9 दिवसांत 10 लाखांपेक्षा जास्त वाचकांनी भेट दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत चौपट उलाढाल झाली. राष्ट्रीय पुस्तक न्यास आयोजित महोत्सवाचा समारोप रविवारी झाला. महोत्सवाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. 

गेल्यावर्षी साडे चार लाख नागरिकांनी भेट दिली होती, तर 11 कोटी रुपयांची पुस्तके खरेदी झाली होती. यंदा नागरिकांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला. यात 50 टक्के तरुण, 25 टक्के लहान मुले होती. तब्बल दीड लाख शालेय विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेट दिली.

ट्रेंडिंग बातमी - Chhagan bhujbal: 'तरुणांना संधी द्यायची होती तर मला उभं का केलं' अजित पवारांवर भुजबळांचा पलटवार

पुस्तक महोत्सवाची वैशिष्ट्ये?

gyroscope; picture

  • विविध कार्यक्रमांचा एक कोटीहून जास्त नागरिकांनी घेतला ऑनलाइन आनंद
  • 100 हून जास्त पुस्तकांचे प्रकाशन
  • एक हजार लेखकांनी प्रदर्शनात दिली भेट
  • दीड लाखाहून अधिक पुस्तके वाचकांना दिली भेट

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com